Breaking News
जालना जिल्हा

जालन्यात रासपचे दुध वाटून लक्षवेधी आंदोलन-प्रती लिटर १० तर भुकटीस ५० रूपये अनुदान द्या : ओमप्रकाश चितळकर


जालना ब्युरो : दुध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाने मदतीचा हात द्यावा यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून रासपचे प्रदेश सचिव ओमप्रकाश चितळकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी ( ता. ०१) जालन्यात दुध वाटप करून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. तथापि राज्य शासनाने प्रती लिटर १० रूपये तर दुध भुकटीस ५० रूपये अनुदान द्यावे अशी आग्रही मागणी ओमप्रकाश चितळकर यांनी यावेळी केली.

दुध उत्पादक शेतकरी व पशुपालक यांच्या आर्थिक उन्नती साठी रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर हे स्वतः मैदानात उतरले असून त्यांच्या सूचनेनुसार रासपच्या वतीने प्रदेश सचिव ओमप्रकाश चितळकर यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यात ठिक – ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करून दुध वाटप करत लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
जालना शहरातील विविध ठिकाणी गरजवंतांना दुध वाटप करण्यात आले.


ओमप्रकाश चितळकर यावेळी म्हणाले की, महायुती सरकारमध्ये तत्कालीन दुग्ध व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली दुधास ७रूपये प्रती लिटर अनुदान दिले होते. सध्या कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत दुध उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून राज्य शासनाने दुध उत्पादकांच्या थेट खात्यात प्रती लिटर १० रूपये तर दुध भुकटीस पन्नास रूपये अनुदान द्यावे अशी मागणी ओमप्रकाश चितळकर यांनी केली.

आंदोलनात कैलास कोळेकर, विनोद मावकर, सिध्देश्वर खरात, संदीप पवार , शिवाजी जोशी, संतोष काळे, भगवान कोल्हे यांनी सहभाग नोंदवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक