परतूर तालुका

परतूरात पुन्हा 10 कोरोना बाधीत रुग्णांची भर


दिपक हिवाळे परतूर न्यूज नेटवर्क

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या परतूर शहरात एकाच दिवशी 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने परतुरात खळबळ उडाली आहे. शहरातील बालाजी गल्ली 4, मोंढा 3 , जिजाऊ नगर खतीब मोहल्ला व मसाला प्रत्येकी 1 रुग्ण असे एकूण शहरात 10 रुग्णाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याची माहिती परतुर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.डी. आर. नवल यांनी न्यूज जालना प्रतिनिधीशी दिली.

दरम्यान शहरात एकाच वेळी 9 व मसाला गाव 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ माजली असून तालुक्यात कोरोणा रुग्नाच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक