भोकरदन तालुका

भोकरदन मध्ये एका रात्रीत चोरट्यांनी फोडली सहा दुकाने ,व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन शहरात शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत सरकारी दवाखान्या समोरील बालदेवदास कापड दुकान व चार मेड‌िकल सह एक मोबाईल दुकानांचे शटर तोडून हात साफ केला.या घटनेत कापड दुकानांमधील व मेड‌‌िकल सह मोबाईल दुकानातील साहित्य सी.सी.टीव्हीचे हार्ड डिस्क चोरट्यांनी लंपास केले आहे.या घटनेमुळे शहरात व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


शहरातील विविध भागात चोरट्यांनी अक्षरशः हैदोस घातलेला दिसतो.शहरातील एका कापड दुकान सह तब्बल चार मेड‌िकल स्टोअर्स व एक मोबाईल दुकान चोरट्यांनी फोडले.शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानात चोरी केली.शहरातील सरकारी दवाखान्या समोरील शालिकराम गाढे यांच्या मालकीच्या बाल देवदास कापड दूकांचे शटर तोडून चोरटे दुकानात घुसले. दुकानातील जीन्स पँट,साड्या, अंडरवेअर सह काही कपड्याची सामानांची फेकाफेक करीत चोरट्यांनी गल्ल्यातील पैसे व कापड असा लंपास केले. त्यानंतर चोरट्यांनी सिल्लोड रोड वरील एकाच ठिकाणी असलेले विजय लोखंडे यांच्या अजुबाई मेडिकल व राहुल जाधव यांच्या मातोश्री मेडिकल,आर्यन मेडिकल व नवीन भोकरदन भागातील मव्हारे मेडिकल च्याही शटरचे कुलूप तोडण्यात आले.मेडिकल मधील वस्तूंची नासधूस केली.तसेच शहरातील व्यापारी खलील शेख यांच्या मोबाईल दुकांचा कुलूप तोडून गल्ल्यातील पैसे व सी.सी.टीव्हीचे हार्डडिस्क चोरट्यांनी लंपास केले.तसेच गल्लयात असलेली काही रोकड व चिल्लर लंपास केली. दरम्यान या प्रकरणी चोरट्यांनी सत्तर हजार रुपये व काही वस्तू लंपास केल्या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बी.टि नागरगोजे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक