Breaking News
घनसावंगी तालुका

तालुका कृषी कार्यालयाकडून एकत्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर शेतकर्याना मार्गदर्शन

घनसावंगी प्रतिनीधी : नितिन तौर

घनसावंगी तालुक्यातील घाणेगाव येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय घनसावंगी यांच्या वतीने कापूस पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापण या विषयावर शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला शिवार फेरी घेऊन पीक परिस्थिती पहाणी करण्यात आली,प्रगतिशील शेतकरी पंढरीनाथ साबळे यांनी जेविक पद्धतीने लागवड केलेल्या पिकांची पाहणी केली नंतर केशव साबळे यांच्या शेतामध्ये शेतीशाळा घेण्यात आली यामध्ये सविस्तर मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी कु. स्नेहल धायगुडे मॅडम यांनी केले त्यांनी सांगितले की कापूस पिकावरील कमी खर्चाचे कीड व रोग व्यवस्थापनात बोंडआळी प्रसार रोखण्यासाठी व हालचाली वर लक्ष ठेवण्यासाठी पिकांमध्ये एकरी दोन या प्रमाणे पेक्टिनोल्युर हा सक्रिय घटक असणारे कामगंध सापळे लावावेत कापसाच्या मधील पादुर्भावग्रस्त डोमकल्या वेचून नष्ट कराव्यात 10 टक्के डोमकळ्या ही अर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फुलोरा अवस्थेत 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणीकरावी त्यामुळे गुलाबी बोंडआळीच्या पतंगाना अंडी घालन्यापासून प्रतिबंध होतो, नत्र, स्फुरद,पालाश, यांचे कार्य व कमतरतेमुळे होणारे नुकसान, कापूस पिकातील अंतर पिकपद्धतीचे फायदे, शेंद्रिय कर्ब.वाढविण्याकरिता उपाय, माती परीक्षण करून खताचे व्यवस्थापण असे आव्हान मंडळ कृषी अधिकारी स्नेहल धायगुडे यांनी केले शेतीशाळेमध्ये घरच्या घरी निंबोळी अर्क कशा प्रकारचे बनवायचे याचे प्रात्याक्षिक कृषी सहायक श्री किरण घादगीने करून दाखविले त्याच बरोबर कामगंध सापळे या विषयी माहिती त्यांनी दिली. या शेतीशाळा उपसरपंच सुधाकर साबळे, पंढरीनाथ साबळे अमोल पाटील,दिगांबर साबळे,ज्ञानेश्वर साबळे,व महिला शेतकरी उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक