Breaking News
भोकरदन तालुका

एकेफळ परिसरात वादळीवार्यासह जोरदार पाऊस,पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

मधुकर सहाने : भोकरदन


भोकरदन एकेफळ परिसरात दि, 31 जुलै रात्री व १ आॅगस्ट रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे मका ,कापूस ,मूग तशेच इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
या वर्षी दुबार पेरणीचे संकट आले होते आणि आता अतिवृष्टी मुळे सर्व पिके आडवी झाली आहे त्यामुळे शेतकरी हा हताश होऊन बसला आहे.


एकेफळ परिसरात जास्तीत जास्त क्षेत्र हे कोरडवाहू असल्याने येथील शेतकरी खरीप हंगामातील पिकावरच अवलंबून असतो आता मात्र खरीप पिकच आडवे झाल्याने शेतकऱ्यांनी काय करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे बी बियाणे , खते, औषधी यांचे भाव गगनाला भिडलेले असतात शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च करून पीक जोमाने आणले होते पण वादळी वारा आणि अतिवृष्टी मुळे सर्व पिकांचे नुकसान झाले आहे


तरी सरकारने या पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी केलेली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक