Breaking News
भोकरदन तालुका

प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ग्रामीण भागातील मुलींच्या समोर वेगळा आदर्श निर्माण करणारी सीता काळे

मधुकर सहाने : भोकरदन


शेतात आई वडिलांना मदत करून ,रोज शाळेत तीन किलोमीटर पायी जाऊन वडीकाळ्या येथील सीता विलास काळे हिने दहावीच्या परीक्षेत 90.90टक्के मार्क घेऊन सुखापुरी हायस्कूल मधून दुसरा क्रमांक पटकावला आहे.
सीता काळे हिने या यशाने परिसरात वेगळा आदर्श निर्माण केला आहे.प्रतिकूल परिस्थितीत आई वडिलांना शेतात कामाला मदत करून सकाळी लवकर उठून शेतातून अर्धा किलोमीटर चिखलात चालत येऊन पुन्हा गावापासून 3 किलोमीटर अंतरावर पायी जाऊन आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
वडीकाळ्या येथील शेतकरी विलास काळे यांना 4 एकर शेती असून त्यांना 4 मुली व 1 मुलगा आहे त्याच्या चारही मुली खूप हुशार आहेत त्यामध्ये दुसऱ्या नंबरची असलेली सीता तिने वर्षभर शाळा करुन,आपल्या आई वडिलांना शेतात आणि घरकामात मदत करून हे यश मिळवले आहे त्यामुळे तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


समईच्या उजेडात केला अभ्यास-
विलास काळे हे शेतात रहात असल्यामुळे शेतात नेहमीच लाईट जात असते त्यामुळे सीता घरामध्ये समई पेटून ठेवत असे आणि त्या उजेडात अभ्यास करत असे.सीता ने सुखापुरी हायस्कूल मधून दुसरा क्रमांक पटकावला आहे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


बहिनीने सोडले शिक्षण –
सिताची मोठी बहीण गीता हिने दहवीमध्ये 80 टक्के गुण घेऊन परिस्थितीमुळे अकरावीत प्रवेश घेतला नव्हता.चार मुलींचा खर्च वडीलांना झेपत नसल्यामुळे त्यांनी आपल्या मोठी मुलगी गीता ला दहवी मध्ये 80 टक्के मार्क मिळून सुध्दा आकरावी मध्ये प्रवेश घेतला नव्हता कारण त्यांनी गीता नंतर असलेल्या तीन मुलींची चिंता होती.
गिता प्रमाणे आपले शिक्षणसुध्दा अर्धवट राहिली ही भीती आता सिताला वाटत आहे त्यामुळे ग्रामिण भागातून शाळेतून दुसरा क्रमांक मिळविला असला तरी तरी चेह-यावर आनंद दिसत नाही तर एकच चिंता आहे की आपल्या बहिनी प्रमाणे आपल्यालाही आता शिक्षण सोडावे लागते की काय ?
सिताला पुढील शिक्षण घेण्यासाठी अनेकांनी मदत करण्याची तयारी दाखवली आहे.


सिताला मदत मिळाली तरच ती पुढील शिक्षण पूर्ण करू शकणार आहे नसता सिताचे शिक्षण 10 च्या पुढे जाणार नाही.तिला शेतात काम करून आपल्या आई वडिलांना मदत करावी लागणार आहे.मात्र तिला पुढील शिक्षणात मदत मिळाली तर सीता पुढील शिक्षण पूर्ण करू शकेल.सीता च्या पाठीमागे अजून 3 बहिणी आणि 1 भाऊ आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक