Breaking News
घनसावंगी तालुका

आश्चर्यच! जुळ्या भावांना दहावीत मार्कही सेम टू सेम..!

घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड येथील जुळ्या भावाना गुण ही जुळेच

धर्मराज आंधळे/पिंपरखेड
जुळ्या भावांचे स्वभाव, सवयी सगळ्या सारख्याच असतात का असा कुतुहलमिश्रित प्रश्न नेहमी सगळ्यांना पडतो. पण ‘या’ जुळ्यांना तर चक्क दहावीत मार्कही ‘जुळे’च पडलेत…
ते दोघे जुळे भाऊ, एक अभ्यासात हुशार तर दुसरा खेळात तरबेज. दोघांचा अभ्यास वेगवेगळ्या खोलीत. परीक्षेला नंबरही पडले दोन वेगवेगळ्या शाळेत. पण दहावीचा निकाल लागला आणि काय आश्चर्य.. दोघांनाही समान गुण. घनसांवगी तालुक्यातील पिपंरखेड बु. येथील विष्णु आणि महेश या दोन भावांची ही कथा. दोघांना ७३ टक्के गुण मिळाल्याने सध्या या दोघांवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.

विष्णु महादेव जायभाये व महेश महादेव जायभाये हे दोघे भाऊ मत्स्याेदरी विद्यालय पिपंरखेड बु. या शाळेत शिकत होते. आई व वडिल चुलते चुलती आजी आजाेबा असा माेठा शेतकरी परिवार आहे . दोघेही बालवाडी पासून एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकत होते. पण आतापर्यंत त्यांना समान गुण कधीच मिळाले नाहीत. पण दहावीच्या परीक्षेत योगायोग जुळून आला आणि दोघांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक