Breaking News
भोकरदन तालुका

क्रॉपसॅप योजनेअंतर्गत महिला शेतकरी शेतीशाळेचे आयोजन

पिंपळगाव रेणुकाई /

कृषि क्षेत्रामध्ये महिलांचे प्रत्यक्षात योगदान लक्षात घेता महिला शेतकऱ्यांना शेतीविषयी तंत्रज्ञान आधारित ज्ञान देवून कष्टाची शेती फायद्याची करणे काळाची गरज बनली आहे.सदरील बाबीचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाने महिला शेतकऱ्यांच्या शेतीशाळा घेण्यावर अधिकचा भर दिला आहे.या गोष्टीला अनुसरून भोकरदन तालुक्यातील धावडा मंडळामध्ये मौजे पोखरी येथे क्रॉपसॅप योजनेअंतर्गत मका पिकावरील महिला शेतकरी शेतीशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले . सद्याच्या परिस्थितीमध्ये कोविड 19 चा प्रार्दुभाव पहाता शेतीशाळेमध्ये सहभागी झालेल्या 25 महिला शेतकऱ्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप करून सामाजिक अंतर राखण्यात आले.तसेच शेतीशाळेसाठी आवश्यक किटचे वाटप करण्यात आले.शेतीशाळेची सुरुवात पोखरी च्या कृषिसहाय्यिका सौ.रुपाली भोसले यांनी आय.सी.एम.टाळी वाजवून करण्यात आली.यावेळी सौ.रुपाली भोसले यांनी लघुअभ्यासामध्ये रासायनिक किटकनाशकांचा मानवी शरीरावर होणारा दुष्परिणाम चार्ट च्या माध्यमातून व याविषयीचे पत्रक उपस्थित महिला शेतकऱ्यांना वाटप करून सांगितले.तसेच सांघिक खेळामध्ये लांब साखळी खेळाचे आयोजन करून शेतीमध्ये उपलब्ध संसाधनाचा पर्याप्त वापर कसा करावा हा सांघिक खेळाचा उददेश पटवून देण्यात आला . विशेष अभ्यासामध्ये 5 % निंबोळी अर्क तयार करणे व मक्यावरील लष्करी अळी व्यवस्थापन कृषिसहाय्यक श्री.उमेश भोसले यांनी चर्चेव्दारे सविस्तर मार्गदर्शन केले.

त्यानंतर शेतीशाळेसाठी निवडलेल्या आय.सी.एम.मका प्लॉटमध्ये जाउन पिक परिसंस्थेची निरीक्षणे घेण्यात आली.या निरीक्षणावरून मका पिकामध्ये करावयाचा कामांचा व किड , रोग व्यवस्थापनासाठी जैविक किंवा रासायनिक औषधांची फवारणी आवश्यक आहे का ? असल्यास कोणती ? याचा सारांश तयार करून निष्कर्ष काढण्यात आले व चार्ट च्या माध्यमातून नोंद करण्यात आली.यानंतर शेतीशाळेचे मुल्यमापन करुन शेतीशाळेची सांगता करण्यात आली . सदरील शेतीशाळेचे यशस्वी आयोजन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी , जालना मा.श्री.बी.आर.शिंदे सर व कृषि उपसंचालक , जालना श्री.विजय माईनकर सर यांच्या प्रेरणेने करण्यात आले . तसेच कृषि पर्यवेक्षक श्री.सी.व्ही.धायगुडे , मंडळ कृषि अधिकारी श्री.डि .एम.दुरगुडे व तालुका कृषि अधिकारी श्री.डी.बी.व्यवहारे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक