भोकरदन तालुका

रक्षाबंधनावर कोरोनाचे सावट राख्या खरेदीला थंड प्रतिसाद

गणेश खिस्ते /रेणुकाई पिंपळगाव

हिंदू धर्मसंस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेला तथा बहीण – भावातील प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा रक्षाबंधनाचा सण अवघ्या एक दिवसांवर येऊन ठेपला आहे . असे असताना कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीपोटी ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरविल्याने राखी मार्केट मधे शुकशुकाट दिसत आहे . परगावी वास्तव्याला असलेल्या भावाला पोष्टाव्दारे किंवा कुरियरब्दारे राखी पाठवायची असते . त्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनाच्या सणापूर्वीच्या १५ दिवसांपासूनच बहिणींकडून राखी खरेदीला सुरुवात केली जाते . त्यानुषंगाने राखी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी लाखो रुपये गुंतवून रंगबिरंगी राख्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत . परिसरात ठिकठिकाणी राख्यांची दुकाने सज्ज झाली आहेत ; मात्र गेल्या काही दिवसांपासून तालुक्यासह परिसरातील जवळपास सर्वच भागात कोरोनाचे सावट गडद होत असल्याने भीतीदायक वातावरण निर्माण झाले असून त्याचा थेट परिणाम राखी विक्रीवरही झाल्याचे दिसत आहे – सकाळपासून सायंकाळपर्यंत राख्या खरेदी करायला येणाऱ्या ग्राहकांच प्रमाण अगदीच अल्प असून आज आणि उद्या या दोन दिवसांतही विशेष विक्री होणार – नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान : होणार असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे . त्यामुळे आमची अर्थीक घडी पुर्णपणे विस्कटली असुन आणलेल्या मालाचे पैसे वसूल होतात की नाही याची चिंता त्यांना सतावत आहे .
कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटा मोठा फटका सराफा विक्रित्यांना सुध्दा बसला आहे . रक्षाबंधनानिमित्त काही ठराविक ग्राहकांकडून सोने – चांदीच्या राख्यांची मागणी केली जाते . त्यानुसार , यंदाही अशाप्रकारच्या राख्या तयार करण्यात आल्या ; मात्र त्या विक्री होतील की नाही , अशी शंका व्यक्त केली जात असल्याची माहिती विलास ज्वेलर्स पिंपळगाव रेणुकाई यांनी दिली .
दरवर्षी रक्षाबंधनापूर्वीच ग्राहकांकडून राख्यांची मागणी केली जाते , त्यातून हजारो रुपयांची उलाढाल होते . यंदा मात्र हा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाही राखी बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण अगदीच अल्प आहे .दोन दिवसांत व्यवसाय न झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे . शालीक आहेर,राखी विक्रेता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक