Breaking News
संपादकीय

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यास करताना ही घ्यावी काळजी -डॉ. अजय सांबरे

न्यूज जालना ब्युरो :-एकीकडे संपूर्ण देश कोव्हिड विषाणूशी झुंजत असताना व लॉकडाऊनचा कालावधी वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा दिवसभराचा वेळ मोबाईल, संगणक व टीव्ही समोर जात आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब झाल्याने त्याची आपरिहर्ता झाली असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आजारांच्या प्रमाणात वाढ होण्याची चिंताजनक बाब समोर येत आहे .


सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत, बाहेर जाणे बंद आहे यामुळे दिवसभर मुले टीव्ही, संगणक, मोबाइल यामध्ये व्यस्त आहेत.
त्यातच ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचा स्क्रीन टाईम खूपच वाढला आहे . या स्क्रीन टाईमचे मोठे दुष्परिणाम असून डोळयांना कोरडेपणा येणे, डोळे लाल होणे, खाजवणे, डोळ्यांवर सूज येणे , डोकं दुखणे, तिरळेपणा आदींचा समावेश असून त्यामुळे चष्मा लागणे, मायोपिया, दूरचे कमी दिसणे असे आजारही होऊ शकतात. या आजारांबरोबरच स्थूलता, झोप व्यवस्थित न येणे, अटेंशन डेफिसीट या सारख्या गोष्टी देखील पहावयास मिळत आहेत .

नेत्रविकार तज्ञ डॉ. अजय सांबरे

ऑनलाईन अभ्यासाबाबत प्रसिध्द नेत्रविकार तज्ञ डॉ. अजय सांबरे यांनी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण घेणे ही तर गरज असले तर डोळयांवर ताण पडू म्हणून खबरदारी म्हणून प्रत्येक तासीका संपल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिट ब्रेक घ्यावा. प्रकाश असलेल्या ठिकाणीच विद्यार्थ्यांनी तासिकेत सहभागी व्हावे, अंधाऱ्या जागी मोबाईलची तीव्रता जास्त असल्यामुळे थेट डोळयांवर परिणाम होण्याची शक्यता असते. वयोगट 5 ते 10 वर्षातील मुलांनी दिवसांतून फक्त दोन ते अडीच तासच मोबाईल किंवा संगणकावरील तासिकेत सहभागी व्हावे. 10 ते 16 वयोगटातील विद्यार्थ्यांनीही साडे चार ते पाच तास ऑनलाईन तासिकेत सहभाग घेता येईल. मात्र प्रत्येक 1 तासिका संपल्यानंतर किमान 15 ते 20 मिनिटे ब्रेक घेणे आवश्यक आहे. अधून-मधून सुती कपडयाची ओली पटटी डोळयावर ठेवावी. तसेच ऑनलाईन तासिकेत सहभागी होत असल्यामुळे त्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी मोबाईल, संगणक, टी.व्ही. चा वापर जवळपास करूच नये.

तसेच दिवसातून किमान 9 तास झोप ही आवश्यक असल्याचे डॉ. सांबरे यांनी सांगितले. त्याच प्रमाणे मैदानी व्यायाम हा महत्त्वाचा घटक आहे.सद्य परिस्थितीत जर बाहेर जाता येत नसेल तर घराच्या गच्चीवर किंवा गल्लीच्या गल्लीत सामाजिक अंतर राखत चालण्याचा व्यायाम दिवसातून एक तास करावा, असेही डॉ. सांबरे शेवटी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक