जालना जिल्हा

जिल्हयात परत ३१ कोरोना बाधीत रुग्णांची भर

न्यूज जालना ब्युरो दि 2- रविवारी रात्री ३१ संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर ६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. तर एका कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मूत्यु झाला असून, एकुण बळींची संख्या ७३ वर पोहचली आहे. कोरोना बाधीत रुग्णांत शहरातील गणपती गल्ली 4, शंकर नगर 3, वैभव कॉलनी, पोस्ट ऑफिस रोड प्रत्येकी 2, नाथबाबा गल्ली, चंदनझिरा, करवा नगर, साईनगर, भुरेवाल गल्ली, विद्यानगर, बालाजी नगर, गोपीकिशन नगर, समर्थ नगर, रोहीला गल्ली, अंबर हॉटेल जवळ प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे . तर ग्रामीण भागातील नागेवाडी 2, घनसावंगी तालुक्यातील भोगगाव १, परतुर, हस्तपोखरी अंबड, पोस्ट ऑफिस रोड भोकरदन, शहागड प्रत्येकी 1 रुग्ण तसेच अमृत साई प्लाझा औरंगाबाद येथील एक रुग्ण तर एक रुग्ण ज्याचा पूर्ण पत्ता दिलेला नाही. अशा एकूण 31 रुग्णांचा समावेश असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अभ्यास करताना ही घ्यावी काळजी -डॉ. अजय सांबरे
https://newsjalna.com/?p=11496
रक्षाबंधनावर कोरोनाचे सावट राख्या खरेदीला थंड प्रतिसाद

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक