जालना जिल्हा

चांदई एक्को येथे पोखरा योजनेअंतर्गत शेतमजुरांना कौशल्य प्रशिक्षण

चांदई एक्को येथे कृषी सहाय्यक पल्लवी शिवणकर यांचा मार्गदर्शनाने संपन्न.
राजूर / दत्ता डवले
श्री क्षेत्र राजुर येथून जवळच असलेले चांदई एक्को येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेत मंजुरा साठी कौशल्य प्रशिक्षण सोमवारी संपन्न झाले

मौजे चांदई एक्को येथे गावातील शेतमजुरांना प्रयोगशील शेतकरी सुरेश ढाकणे यांच्या शेतावर शेती शाळा समन्वयक शालिक राव वाघ यांनी फवारणी चे वेळी घ्यावयाची दक्षता याबद्दल मार्गदर्शन केले व मागील वर्षात अनेक शेतकऱ्यांना तसेच शेतमजुरांना कीटकनाशक फवारताना विषबाधा झाली होती ते टाळण्याकरिता औषध फवारणी पूर्वी एकात्मिक कीड व्यवस्थापन, फवारणी करताना जैविक कीडनाशकांचा वापर करावा नंतर नुकसानीचे आर्थिक पातळी वाढल्यास रासायनिक कीटकनाशकाचा वापर करावा तसेच फवारणी करतेवेळेस आपले स्वतःचे संरक्षण करण्यासाठी संरक्षण किट वापरावे याबद्दल सविस्तर माहिती दिली.

शेतीशाळा प्रशिक्षक संजय चव्हाण यांनी उपस्थित शेतमजुरांना कीडनाशक फवारणी चे तंत्रज्ञान सांगितले तसेच फवारणीचे काम संपल्यानंतर औषधाचे च्या डब्या ची विल्हेवाट कशी लावायची याबद्दल माहिती.कृषी सहाय्यक पल्लवी शिवणकर यांनी शेतमजुरांना व शेतकरीवर्ग यांना विविध सापळे जसे की कामगंध सापळे,चिकट सापळे, प्रकाश सापळे याचा वापर करावा. व पिकामध्ये विविध ठिकाणी पक्षी थांबे लावावेत. समूह सहायक सुयश सावंत यांनी गावातील बचत गटांच्या महिलांना सुरक्षित किट गावातल्या गावात तयार करण्यासाठी प्रोत्साहित करून शासनाद्वारे 60 टक्के आर्थिक मदत देण्याबद्दल माहिती दिली.

रिसोर्स पर्सन ज्ञानेश्वर टोम्पे यांनी संरक्षण किट घरच्या घरी बनवणे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. फवारणीपूर्वी प्रत्येक कीटकनाशक आवर औषधाच्या बॉटल वर विष दर्शविणारा सिम्बॉल असतो. त्यावरील हिरवा रंग असेल तर औषध विषारी आहे, तोच रंग निळा असल्यास मध्यम विषारी आहे,पिवळा असल्यास विषारी आहे आणि लाल असल्यास अति विषारी असल्याचे दर्शवितात. हे सिम्बॉल्स समजून फवारणी करताना विशेष काळजी घ्यावी. श्वासाद्वारे औषध पोटात जाऊ नये म्हणून मास्क लावणे, हॅन्ड ग्लोज तसेच फवारणीची सेफ्टी किट चा वापर करावा.किट उपलब्ध नसल्यास घरगुती कमी खर्चात सेफ्टी किट कशी बनवायचे तसेच फवारणीपूर्वी काळजी कशी घ्यायची याची प्रात्यक्षित सुद्धा करून दाखवण्यात आले.

यावेळी उपस्थित शेतमजूर व शेतकरी वर्ग गावातील सरपंच अण्णा सेठ ढाकणे,उपसरपंच आप्पासाहेब तळेकर,माजी सरपंच रामदास पाटील तळेकर, भाऊसाहेब तळेकर,शंकर ढाकणे,सुदाम तळेकर, जनार्दन तळेकर या गावातील शेतकरी शेतमजूर उपस्थित होते. शेती शाळा यशस्वी करण्याकरता गावचे पोलीस पाटील दादाराव तुकाराम पवार यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक