Breaking News
बदनापूर तालुका

बदनापूर तालुक्यातील काजळा येथे बियाणे न उगवल्याने बियाणे विक्रेत्यावर गुन्हा दाखल.


काजळा/प्रतिनिधी(भगवान धनगे)दि.3 बदनापूर तालुक्यातील काजळा शिवारातील एका शेतकऱ्याने दोन एकर पेरलेले सोयाबीन उगवून न आल्यामुळे बदनापूर पोलिसांत जालना येथील कृषी साहित्य विक्री करणाऱ्या दुकानावर व त्याच्या मालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एकच खळबळ उडाली आहे.

बदनापूर तालुक्यातील काजळा येथील जगदीश श्रीकिसन पैठणे या तरुण शेतकऱ्याकडे काजळा शिवारात चौदा एकर जमीन आहे. या जमिनीपैकी दोन एकर क्षेत्रात या शेतकऱ्याने सोयाबीन पिकाची पेरणी केलेली होती. या क्षेत्रात पेरणी करण्यासाठी सदरील शेतकऱ्याने जालना येथील बस स्टँडरोडवरील विपिन सीड्स या दुकानातून दोन बॅग सोयाबीन बियाणे सतरा जून रोजी खरेदी केले होते. त्यानंतर वीस जून रोजी सदरील बियाणे त्यांनी आपल्या शेतजमिनीत पेरले. मात्र सदरील बियाणे बोगस असल्यामुळे ते उगवून न आल्यामुळे या शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकाऱ्यांना या बाबत माहिती दिली.

त्यांनी खरेदी केलेल्या बियाण्यांची खात्री केली असता त्या बियाण्यांची उगवण क्षमता सत्तर टक्के असल्याचे सांगून ज्या ठिकाणी हे बियाणे पेरले आहे त्या ठिकाणाची पाहणी केली असता सदरील बियाण्यांची उगवण क्षमता सत्तर टक्के असतानाही फक्त सत्तावीस टक्के सोयाबीन उगले असल्याचे त्यांच्या तपासणीत आढळून आल्यामुळे त्यांनी तसा अहवालही दिलेला आहे. त्या अहवालाच्या आधारे जगदीश पैठणे यांनी बदनापूर पोलिसांत विपिन सीड्स या दुकानाच्या मालकाविरुद्ध व सदरील बियाणे कंपनीविरुद्ध बोगस बियाणे देऊन फसवणूक केल्याची तक्रार दिली. पोलिसांनी दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलिस निरीक्षक भिमाळे हे तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक