घनसावंगी तालुका

घनसावंगीत भाजप व रासप चे दुध एल्गार आंदोलन.

घनसावंगी / नितीन तौर घनसावंगी येथे भारतीय जनता पार्टी व रासप च्या वतीने सोमवारी सकाळी दुध एल्गार आंदोलन करण्यात आले यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसिलच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आले. आंदोलनाच्या माध्यमातून दुध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर 10 रू अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे , दूध भुकटीच्या निर्यातीसाठी प्रती किलो 50 रू अनुदान द्यावे , गाईच्या दुधाला 30 रू चा दर द्यावा, जर या आंदोलना बाबत सरकार गंभीर नसेल व दुध उत्पादकांच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभरात दुधाचे टँकर फिरू देणार नाही हा इशारा या आंदोलनात देण्यात आला यावेळी पोलीस उपनिरीक्षक माने व तहसीलचे मंडळ अधिकारी एस कोरडे  यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रमेश महाराज वाघ,भाजपा किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस अंकुशराव बोबडे,भाजपा अ.जा.प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव जाधव,भाजपा किसान मोर्चा ता.अध्यक्ष कैलास शेळके,गोविंद ढेंबरे,रासप ता.अध्यक्ष तुळशीराम कोरडे, रासप युवा ता.अध्यक्ष गजानन वायसे,भास्कर पांढरे,योगेश ढोणे,एकनाथ महाराज राठोड,सुरेश उगले,सुरेश पोटे,अर्जुनराव माळोदे,कांता वराडे,रमेश काळे,बाळासाहेब बोरकर,प्रकाश गहिरे,गणेश मोटे, बप्पा देवडे,नाना सोळंके, सिद्धेश्वर भाणुसे,किशोर गिराम,राहुल काळे,नितीन भुतेकर,संभाजी काळे,लक्ष्मण मोटे,नामदेव सोळंके,अर्जुन थेटे,अमोल काळे,संदीप काळे,रामेश्वर काळे,माऊली सानप,दत्ता वाघ्रळ,संजय बरसाले,रामेश्वर गावंडे,मधुकर गुढेकर,विश्वास घुले,अक्रम भाई,लियायत पटेल,नानासाहेब वैद्य,नवनाथ मिठे,अफरोज बागवान,भगवान ढेरे,उत्तम ढेरे,बलिभाऊ शिंदे,मारोती भालेकर, कैलास भालेकर,गजानन वाघ,हरिभाऊ मिसाळ,विजय खिल्लारे,विशाल वडे,विजय भालेकर, सतिष कैलासराव परदेशी डिगाबर मस्के ढेरे,दिनकर वाघ,शरद नागरे व मोठ्या संख्येने कार्यकर्तेउपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक