जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात पुन्हा ४२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह – एकूण रुग्णांची संख्या २३७७ वर

न्यूज जालना ब्युरो- जालना जिल्हयात कोरोनाच्या ४२ रुग्णांची वाढ झाली असून एकूण रुग्णसंख्या आता २३७७ वर पोहचली आहे . आतापर्यंत ७३ कोरोना बधितांचा बळी गेलेला आहे तर एकूण १५६२ रुग्ण आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेले आहे दरम्यान जिल्ह्याची एकूण ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ७४२ वर पोहचली आहे. जालना शहरातील साईनगर ०१ , गणपती गल्ली ०४ , भुरेवाल गल्ली ०१ , शंकरनगर ०३ , विद्यानगर ०१ , बालाजीनगर ०१ , गोपिकिशन नगर ०१ , चंदनझिरा ०१ , करवानगर ०१ , हस्तपोखरी ०१ , वैभव कॉलनी ०२ , पोस्ट ओफिस भोकरदन ०१ , रोहिला गल्ली ०१ , शहागड ०१ , कुचरवटा ०१ , अंबर होटेल परिसर ०३ , समर्थनगर ०१ , अमृत प्लाझा औरंगाबाद ०१ , नाथबाबा गल्ली ०१ , भायगाव ता घनसावंगी ०१ , नागेवाडी ०२ , परतुर ०१ , असे एकुण ३१ व्यक्तीच्या स्वबचा व अँटीजेन तपासणीद्वारे ११ व्यक्तींचा अशा एकुण ४२ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली . १२ रुग्णास डिस्चार्ज जालना शहरातील संभाजीनगर ०१ , रामनगर ०१ , आर पी रोड ०१ , सिंधी भवन ०३ , कन्हैय्यानगर ०३ , आनंदवाडी ०२ , लडडा कोलनी परतुर ०१ अशा एकूण १२ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली . जिल्हा प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शन हेल्पलाईन ची सुरवात – जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की , करोना आजारासंबंधी असणा – या अडचणी , समस्या या संदर्भात मार्गदर्शनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरु करण्यात आली असुन हेल्पलाईन नंबर ७२६२ ९ २७३७३ आहे.या हेल्पलाईन वरुन तज्ञ डॉक्टर व काही प्रशासकिय अडचणी असल्यास प्रशासकिय अधिकारी मार्गदर्शन करतील.तरी या हेल्पलाईनचा जिल्ह्यातील नागरीकांनी मोठया प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक