परतूर तालुका

व्यापार्‍यांकडून स्वंयफुर्तिने परतुरात चार दिवसांचा लॉकडाऊन

दिपक हिवाळे/ परतूर न्यूज नेटवर्क परतूर तालुक्यात कोरोणा रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता परतूर व्यापारी असोशियन तर्फे चार दिवसाचा स्वयंघोषीत बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय झाला असुन मंगळवार दि. 4/8 / 2020 ते 7/8 / 2020 पर्यंत व्यापा-यांचा स्वंय घोषित परतूर बाजार पेठ बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. शहरातील वाढत्या कोरोना ग्रस्त रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी व कोरोणाची साखळी तोडण्यासाठी व्यापारी व्यवसाय प्रतिष्ठान मंगळवार दि.04 ऑगस्ट 2020 ते शुक्रवार 07 आगस्ट 2020 पर्यंत स्वंयस्फूर्तीने बंद ठेवणार आहेत असे उपविभागीय अधिकारी परतूर, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे परतुर, मुख्याधिकारी नगर परिषद परतुर यांना निवेदन दिले असून शासन स्तरावर किमान 04 (चार ) दिवस परतुर शहरासाठी संपूर्ण लाँकडाऊन अत्यावश्यक सेवा मेडिकल, डॉक्टर, दूध व्यवसाय, फर्टीलायझर वगळून लागू करावा . अशीही विनंती निवेदनात करण्यात आलेली आहे. दिलेल्या निवेदनावर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शिवप्रसाद दगड , सचिव अजित पोरवाल , कूणाल आकात ,सूनिल कासट , राम दरगड ,मूकेश केजडीवाल ,गोपाल दरगड , बाळासाहेब काळे , राहूल सातोनकर , नारायण मूंदडा , अनिल वाशींबे ,आश्विन दायमा , महेश दहिवाळ , महेश आकात , विकास पवार व आदी व्यापारी सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक