बदनापूर तालुका

बदनापूर तालुक्यातील भाकरवाडी येथील तलाव ओवरफ्लो

बाजार गेवराई/ प्रतिनिधी बदनापूर तालुक्यातील भाकरवाडी ( बाबुवाडी ) येथील जालना औरंगाबाद जिल्ह्यातील सिमेलगत असलेल्या लघु माध्यम प्रकल्प मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे ओव्हरफ्लो झाला आहे. भाकरवाडी, नांदखेडा , लाडसांगवी , आदी परिसरात दोन तीन दिवसांनी आदोगर मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसामुळे परिसरातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर वाढली या परिसरातील मक्का , सोयाबिन , कापुस ,आदी पिकांचे जास्त झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बऱ्याचशा ठिकाणी शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे व पिके पिवळी पडत आहे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी येथील शेतकरी वर्गातून होत आहे परिसरात जोरदार पावसामुळे भाकरवाडी ( बाबुवाडी) हा तलाव हाऊसफुल्ल झाला असल्याने ह्या तलावांतील पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी लांडसांगवी ,नांदखेडा ,पिंपखुटा, आदी विविध गावांतील पर्यटक परिसरात गर्दी करताना दिसत आहेत सदर तलावासाठी जालना जिल्ह्यातील व औरंगाबाद जिल्ह्यातील जमिनी संपादित केलेल्या असुन तालाव हाऊसफुल्ल झाल्यामुळे परिसरात शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे व सोमठाणा येथील दुधना अप्पर प्रकल्पात मोठ्या झापाट्याने पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली असुन सोमठाणा येथील धरण कोणत्या ही क्षणी हाऊसफुल्ल होण्याची शक्यता नाकारता येत नाही

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक