मुंबई

आता गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना

पिंपळगाव रेणुकाई /न्यूज जालना ब्युरो –

गुटखाबंदी कायद्याला तब्बल 8 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लोटून सुद्धा अवैध विक्री रोखण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे . अन्न औषध प्रशासनाकडे ( एफडीए ) मनुष्य बळाची कमतरता असल्याने आता पोलिसांना देखील गुटखा विक्रेत्यांवर स्वतंत्र कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत . राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी गेल्या 10 दिवसापुर्वी याबाबत आदेश काढला आहे

राज्य सरकारने जुलै 2012-2013 मध्ये गुटखा आणि पानमसाल्यावर बंदी घातली . तरीही
छुप्या मार्गाने गुटख्याची विक्री केली जात आहे . अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलीस प्रशासन अनेक ठिकाणी छापेमारी करुन अवैध गुटखा व्यावसायिकांवर कारवाया करीत आहेत . मात्र त्यांचे प्रमाण कमी होते त्यामुळे एफडीए ने पोलिसांना देखील कारवाई करण्याचे अधिकार देण्याची शिफारस केली होती .
त्यामुळे अवैध मार्गाने गुटख्याची साठेबाजी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

या कलमानुसार होणार कारवाई कलम 188 साथरोग कायदा 1897 अंतर्गत गुन्हा दाखल होऊन ते 6 महिने कारावास आणि एक हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे . तर कलम 272, 273 अन्वये एखाद्या खाद्य पदार्थाने अपाय होईल असे माहिती असतानाही अशा पदार्थाची विक्री करणे यानुसार 6 महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा . तर कलम 328 अन्वये विषारी नशा उत्पन्न होईल अथवा मानवी आरोग्यास अपायकारक वस्तूंची विक्री करणे त्यानुसार 10 वर्षापर्यंत कारावासाची तरतूद व अजामीनपात्र गुन्हा नोंद करण्यात येईल .

पोलीस विभागाला स्वतंत्रपणे गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले गेल्याने गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचे प्रमाण वाढेल .आणि अवैध पणे गुटख्याचा साठा करून ठेवणा-यांना आळा बसेल .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक