परतूर तालुका

परतूरमध्ये पूलाची ऊंची वाढल्याने शेतकर्‍यांच्या शेतात पाणीच पाणी

दीपक हिवाळे/ परतूर न्यूज नेटवर्क पंढरपूर शेगाव रस्त्याचे काम करीत असलेल्या मेघा इंजिनीरींग कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे वाटूर परतूर रोडवर रोहिना जवळ चांदणी पुलाची उंची वाढवल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले यासंदर्भात सदर शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी परतूर यांच्याकडे धाव घेतली आहे तालुक्यातीलरोहिना खुर्द गट.क्र 15 व 10 येथे माझ्या  मालकीच्या शेतामधे राष्ट्रीय महामार्ग शेगाव ते पंढरपूर  548-C वाटूर परतूर रोडवर चांदणी नाल्यावर पुलाचे बांधकामा करीता लागत असणार्या भरावासाठी  वापरण्यात येनार्‍या अतिरिक्त  जमिनीचे रीतसर भुसंपादन न करता व काहीही पुर्वसुचना न  देता व संमती न घेता मेघा इंजीनियरिंग कंपनी व M.S.R.D.C चे अधिकारी भुसंपादनाची कार्यवाही न करता त्यांनी जमिनीमधे मोठमोठी यंत्रे आणुन जमिनिवर भराव काम करीत आहेत. व  मालकीच्या जमिनिवर दमदाटीदडपशाहीच्या मार्गाने अतिक्रमण करीत आहेत. वस्तविकपाहता माझ्या जमिनीचे भुसंपादन न करताच यापूर्वी वाटूर ते परतूर रस्त्याच्या कामासाठी 12 मीटर (40 फूट) जमीन फुकट काहीही संपादनचीप्रकिया न करताच घेण्यात आलेली होती. व आता पुलाच्या कामामधे बदल करून पुलाची उंची पूर्वीच्या उंची पेक्षा वाढवण्यात आली आहे. व त्या अतिरिक्त उंचीच्या भरावासाठी लागणार्‍या जमिनीचे काहीही पुर्वसुचना न देता व भुसंपादन न करता जोर जबरदस्तीने लॉकडाउनच्या कार्याकाळात तब्बल 40 ते 45 मीटर जमीन ही अतिरिक्त भरावासाठी वापरण्यात आलेली आहे. व या अतिरिक्त जमिनीचा काहीही मावेजा देण्यात आलेला नाही. व माझ्या जमिनीचा काहीही मोबदला न देता वापरकरण्यात येत आहे. व अतिरिक्त भराव केल्यामुळे पावसाच्या पाण्यासाठी व्यवस्थित मार्ग काढुन न दिल्यामुळे वाहुन येणारे पावसाचे पानी माझ्या शेतामधे साचत आहे व त्यामूळे माझ्या पिकाचे  अतोनात नुकसान झाले आहे. याकडे लक्ष घालुन चालू असलेले काम थांबवून व योग्य ती चौकशी करून महामार्गाच्या कामासाठी लागणार्‍या अतिरिक्त जमिनीचे योग्य ते भुसंपादन करून मावेजा देण्यात यावा. अशीमागणी भास्कर खोसे, मधुकर खोसे, महादेव जनार्धन खोसे यांनी उपविभागीय अधिकारी परतूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक