Breaking News
परतूर तालुका

परतुर शहर कडकडीत बंद-चार दिवसाचा बंद चे आवाहन

दिपक हिवाळे परतूर न्यूज नेटवर्क परतूर व्यापारी असोशिएशनच्या वतीने परतूर शहर कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. शहरातील वाढत्या कोरोणा रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी परतूर व्यापारी असोसिएशन तर्फे करण्यात आलेल्या चार दिवसाच्या बाजार पेठ बंद आव्हानाला प्रतीसाद देत शहरातील नागरिकांनी व अस्थापने मालकांनी बदला पाठिंबा दर्शविल्याचे दिसत आहे. दरम्यान परतुर गाव भागात नागरिकांना कोरोना विषाणूचे गांभीर्य नसल्यामुळे गाव भागातील संपूर्ण आस्थापने चालू असल्याचे दिसले. मोंढा भागाप्रमाणे गाव भागातही व्यापारी आणि नागरिकांनी बंदला पाठिंबा देवुन आपआपले दुकाने चार दिवस बंद ठेवावे असा नागरीकांकडून सुर निघत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक