संपादकीय

१५ ऑगस्टला ग्राम पंचायतींवर तिरंगा ध्वज’ कोण फडकवणार? -एका प्रशासकाकडे अनेक ग्रां.पं.चा कारभार

गौरव बुट्टे/महाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुदत संपलेल्या हजारो ग्रामपंचायतींच्या सार्वत्रीक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात.परिणामी सदर ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात आले आहे.नेमण्यात आलेल्या प्रशासकांकडे मात्र एका पेक्षा अनेक ग्रामपंचायतींचा कारभार सोपविण्यात आला असल्यामुळे एक प्रशासक एकाच वेळी अनेक ग्रामपंच्यायतींवर झेंडा वंदनाचा कार्यक्रम कसा पार पाडणार?असा संभ्रम ग्रामवासीयांत निर्माण झाला आहे.

सद्या महाराष्टात ग्रामपंचायतींवर प्रशासकांच्या नेमणुकीवरुन खुप राजकारण सुरु आहे.गावातील योग्य व्यक्तींची निवड करुन प्रशासक नेमण्यात यावा,असे आदेश ग्रामविकास विभागामार्फत संबंधित जिल्ह्याच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. मात्र यासोबतच पालकमंत्र्याच्या सल्यानुसार निवड करावी,असेही कळविण्यात आले होते.त्यामुळे या आदेशाचा सर्वत्र विरोध झाला होता.

पालकमंत्र्याच्या शिफारसी नुसार प्रशासकाची नियुक्ती करायची असल्याने पत्रकारांची व समाजसेवकांची निवड करण्यासंबंधी मुख्यमंत्र्यांनकडे निवेदनाद्वारे मागणी करित आहेत.मात्र सद्या ग्रामपंच्यायतींचा कारभार सचिव आणी प्रशासक म्हणुन नेमणुक करण्यात आलेले शासकिय अधिकारीच सांभाळत आहेत.

यादरम्यान १५ आँगष्ट्र स्वातंत्र्य दिवस हा राष्टीय सन अवघ्या १० दिवसांवर येऊन ठेपला आहे.या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायतींवर ‘तिरंगा’ झेंडा फडकविण्यात येऊन स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येतो.या झेंडावंदनाचा कार्यक्रम गावातील सरपंच यांच्या ‘हस्ते’ करण्यात येतो.परंतु यावेळी हजारो सरपंच्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे त्यांचे जागी प्रशासकांची नेमणुक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका पेक्षा अनेक ग्रामपंचायतींचा कारभार या प्रशासकांवर सोपविण्यात आला आहे.यामुळे एकाचवेळी अनेक ग्रामपंचायतींवर हा प्रशासक कसा ‘तिरंगा’ फडकविणार?असा संभ्रम गावकऱ्यांसह पदाधिकारी,अधिकारी यांच्यात निर्माण झाला असुन प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संभ्रम दुर करावा,अशी मागणी जोर धरु लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक