जालना जिल्हा

जिल्हा कारागृहातील 9 कैद्यांना कोरोनाची बाधा

कोरोना पोहोचला कारागृहात!

न्यूज जालना ब्युरो दि ४ : कोरोनाचा संसर्ग आता सगळीकडेच पसरत चालल्याचे दिसून येत आहे. वर्दळीच्या ठिकाणांहून कोरोना आता थेट कारागृहातही पोहोचला आहे. येथील जिल्हा कारागृहातील नऊ कैदी अँटीजेन चाचणीत कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

दरम्यान, त्यांना रुग्णालयात असलेल्या 55 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. हा वार्ड कैद्यांसाठी राखीव ठेवण्यात आला असून तिथे 24 तास कडक पहारा देण्यात येत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या आदेशानुसार 31 जुलै आणि एक 1 ऑगस्ट रोजी जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील 215 कैद्यांची आणि 40 अधिकारी-कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती.

या टेस्टमध्ये हे 9 कैदी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे.दरम्यान,कारागृहातील कैद्यांच्या वारंवार तपासण्या करण्यात येत असल्याची माहिती कारागृह अधीक्षक अरुणा मुकुटराव यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक