जालना जिल्हा

जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील या गावात आढळले कोरोना बाधीत रूग्ण

न्यूज जालना ब्युरो दि ५ – जालना जिल्ह्यातील 50 संशयीत रुग्णांचे अहवाल मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रूग्णांची संख्या 2495 इतकी झाली असून त्यापैकी आजपर्यंत 1597 रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे. प्रयोग शाळेकडे प्रलंबित असलेल्या 162 नमुन्यांपैकी 161 नमुन्यांचे अहवाल आज मंगळवारी रात्री प्राप्त झाले असून त्यापैकी 111 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 50 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. या पन्नास रूग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या आता 2495 इतकी झाली आहे. प्रयोग शाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार वाळकेश्वर आणि वडीकाळ्या येथील प्रत्येकी चार रुग्णांचा समावेश असून मूर्तीवेस पारशी गल्ली 3,कन्हेय्या नगर,मेसखेडा, मंठा, एसबीआय परतूर आणि मस्तगड जालना येथील प्रत्येकी 2, जुना मोंढा परतूर,म्हसला,डमडम ता.जिंतूर,शहागड,सुरंग नगर,महाकाळा ता.अंबड ,जानकीनगर ता.मंठा,काकडे कंडारी,देऊळगाव राजा,कुंभार पिंपळगाव, अंबा रोड परतूर,पिंप्री ता.जिंतूर, महेबूब नगर अंबड, सिंदखेड राजा,परतूर,भोगगाव येथील प्रत्येकी 1 तसेच जालना शहरातील रामनगर ख्रिस्ती कॅम्प, शिवाजीनगर, सिव्हिल हॉस्पिटल क्वार्टर,साईनगर,इंदिरा नगर,नेहरू रोड,लक्ष्मीनारायनपुरा आणि संभाजीनगर या भागातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक