अंबड तालुका

अंबड शहरात नाकाबंदी व चोख बंदोबस्त

अनिल भालेकर/अंबड

अयोध्या शहरात होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त अंबड शहरामध्ये चोख बंदोबस्त ठेवून कसले प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून अंबड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.के बलैया यांनी जालना-बीड प्रमुख मार्गावर असणाऱ्या पाचोड नाक्यावर चोख बंदोबस्त ठेवून वाहनांची कसून तपासणी केली.

कसला हा प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून अंबड पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे यावेळी बलैया यांनी सांगितले. शहरात दाखल होणाऱ्या वाहनांचे यावेळी कसून तपासणी करण्यात आली.भर उणात,गर्मित चोख बंदोबस्त ठेऊन प्रतेक संशयास्पद वाहनांची तपासणी करूनच वाहनास मार्गस्थ केले. पाचोड नाका हा अंबड शहरातील मुख्य चौक आहे. या मार्गावरून जालन्याहून बीडकडे अनेक वाहने जातात. तसेच पाचोड पैठण मार्गा वरून ही अनेक वाहने या चौकात येतात अंबड शहरात दाखल होणाऱ्या वाहनांचा हा मुख्य चौक आहे.याठिकाणी अंबड पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक