Breaking News
अंबड तालुका

वडीगोद्रीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत तरुणांचा प्रवेश


वडीगोद्री( ता अंबड )
जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यातील अनेक तरुणांनी संघटनेत प्रवेश केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या हस्ते संघटनेचा बिल्ला लावून तरुणांचे स्वागत करण्यात आले.


महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी लढणारे लढवय्ये नेते माजी खासदार राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांच्या कार्याने भारावल्याने या तरुणांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत काम करण्याचा निश्चय व्यक्त केला.


अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील पांडुरंग गटकळ यांनी मराठा महासंघा मध्ये काम केले आहे. जातीसाठी अनेक वर्षे काम केले, आता माती साठी काम करणार असल्याच्या भावना गटकळ यांनी या वेळी व्यक्त केल्या.
तसेच घनसावंगी तालुक्यातील कोठी या गावातील देवकाजी तायडे,पंकज गवते व जयदीप पांढरे आदी तरुणांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला.


यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर,जिल्हाध्यक्ष सुरेश काळे,पांडुरंग गावडे,बप्पासाहेब काळे,अंबरसिंग राजपूत, दिगंबर तारख,बाबासाहेब दखणे,अंकुश तारख,भारत उंडे,गणेश सोळुंके,चंद्रकांत बांगर,ताराचंद पवार,नारायण डहाळे, स्वाभिमानी विध्यार्थी परिषदेचे अध्यक्ष गणेश गावडे,अजय मसूळे, डॉ प्रशांत काळे,कृष्णा वाघ, अजय काळे,अक्षय खापरे आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक