भोकरदन तालुका

भोकरदन येथील बंद केलेले मक्का खरेदी केंद्र त्वरित चालू करुण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दया या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेचे निदर्शने

मधुकर सहाने : भोकरदन


भोकरदन येथील मक्का खरेदी केंद्रावर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या माल घेऊन या असा मेसेज शेतकऱ्यांना करुण मक्का आणन्याचे आव्हान खरेदी केन्द्राकडून केले व खरेदी केंद्र बंद केले त्यामुळे शेतकऱ्यांची मक्का भिजुन त्यांचे नुकसान होत आहे त्याचबरोबर मालवाहु वाहनाचे 1000 रु प्रतिदिन प्रतिवाहन अतिरिक्त भाड़याचा भूरदंड शेतकऱ्यांना सहन करावा लागत त्याची भरपाई द्यावी यासाठी शेतकार्यांनी आन्दोलनाचा पावित्रा घेतला असून मक्का खरेदी केंद्र त्वरित चालू करुण नुकसान भरपाई द्यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली.
या आन्दोलनाचे नेतृत्व किसान सभेचे कॉ. अनिल मिसाळ व बाजीराव फुके यांनी केले असून आन्दोलनास कॉ. अजित पंडित, गजानन गाढे, समाधान वाघ, सुरेश शिंदे, इत्यादि शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक