भोकरदन तालुका

चिट्ठी लिहुन कर्जाच्या धास्तीने केली शेतकर्याने आत्महत्या,भोकरदन तालुक्यातील घटना

मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन तालुक्यात  बुधवारी पेरजापूर येथील तरुण शेतकरी देविदास भगवान तळेकर वय 40 यांनी विविध बँकांचे कर्ज घेतले असून त्या कर्जाच्या धास्तीपोटी मंगळवार रोजी दुपारी आपल्या शेतामध्ये विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपली आहे. मी कर्जाच्या धास्तीने आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेतकरी देविदास तळेकर हे पॅसेंजर ॲपे रिक्षा चालविण्याचा उद्योग धंदा करत होते गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना महामारी मुळे व्यवसाय बंद असलेल्या मुळे त्यांचा ॲपे रिक्षा देखील बंद होता व त्यांना एक एकर जमीन असून गेल्या काही दिवसांपासून ताणतणावात असल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले आहे. मंगळवारी रोजी सकाळी दहा वाजेला ते कुणाला न सांगता घरातून निघून गेले होते मात्र सायंकाळपर्यंत ते घरी परतले नाही. मात्र सायंकाळी त्यांची पत्नी व मुलगा योगेश घरी आल्यानंतर सात वाजेपर्यंत ते घरी दिसून आले नाही व त्यानंतर घरच्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली मात्र रात्री उशिरापर्यंत ते सापडले नाही. बर्‍याच वेळा नंतर गावातील त्यांना शोधण्यासाठी काही तरूण त्यांच्या शेतामध्ये गेले होते तेथे शेतांमध्ये त्यांना लिंबाच्या झाडाखाली तळेकर यांनी विष प्राशन करून ते मृत पावले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या तरुणांनी तात्काळ गावामध्ये कळवून घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्यांना येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरानी घटनास्थळी आले त्यांनी त्यांना मृत घोषित केले. तळेकर यांनी चिखली अर्बन को-ऑपरेटिव बँक, श्री गजानन महाराज अर्बन को-ऑपरेटिव बँक, महिंद्रा फायनान्स, तसेच अन्नपूर्णा फायनान्स यांचेकडून कर्ज घेतले असून जवळपास एकूण पाच लाख वीस हजार रुपये कर्ज घेतले असल्याचे त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शासकीय ग्रामीण रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन करून त्यांच्यावर पेरजापूर येथे शोकाकुल वातावरनात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक