Breaking News
धार्मिकबदनापूर तालुका

२९ वर्षांपूर्वी मोदींनी दिलेला ‘तो’ शब्द झाला पूर्ण- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे.

  बदनापूर : ता.( 05 ) : प्रतिनिधी किशोर सिरसाठ : सद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 29 वर्षांपूर्वी दिलेला तो शब्द पूर्ण केला असल्याचे खा. रावसाहेब दानवे यांनी बदनापूर येथे कार्यक्रमा दरम्यान सांगितले नरेंद्र मोदी अयोध्येत ‘तिरंगा यात्रे’च्या निमित्ताने दाखल झाले होते. कन्याकुमारीमधून ही यात्रा सुरु झाली होती. मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. नरेंद्र मोदींनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधितही केले होते. त्यावेळी महेंद्र त्रिपाठी यांनी मोदींना तुम्ही अयोध्येला परत कधी येणार ? असे विचारले असता ज्या दिवशी राम मंदिराच्या कामाला सुरुवात होईल, तेव्हा मी पुन्हा येईन असे उत्तर दिले होते. त्यानुसार नरेंद्र मोदी २९ वर्षांपूर्वी स्वत:ला दिलेले ते आश्वासन पूर्ण करत असून भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्येत हजर झाले.ते पंतप्रधान नरेंद्र मोदींने यानी पूर्ण केले आज म्हणूच बोले तेसे चाले त्याचे वंदन पाऊले आशा म्हणी प्रमाणे पंतप्रधानाचे कार्य आहे . बदनापूर येथे राम मंदिरात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, व आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते निमित्ताने बदनापूर येथे राम मंदिरात महाआरती व अभिषेक करण्यात आला. राम जन्मभुमी अयोध्या येथे श्रीराम मंदिर भुमिपुजन सोहळ्या निमित्ताने बदनापूर येथील श्रीराम मंदिरात महाआरती केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी राम नामाचा जयघोष केला. यावेळी बद्री पठाडे, वंसतराव जगताप, पदमाकर जऱ्हाड, भीमराव भूजंग, भगवान मात्रे, विलास जऱ्हाड, गणेश कोल्हे, प्रदीप साबळे, सत्यनाराण गिल्डा, संतोष पवार, बाबासाहेब कऱ्हाळे, प्रसाद मंत्री, शांतीलाल मंत्री, राजेश तिवारी, बाबुलाल मंत्री, विष्णू मंत्री,अमर मंत्री, सचिन जोशी, प्रविण बुऱ्हाडे, बालाजी वाघ, बालाजी वाघ, वरून दुधानी, राजु तापडिया, गोरखनाथ खैरे , संदिप पवार, दिपक मुंडलीक, महेश लडडा, सतीश साबळे, आसाराम गरड, रघू होळकर, भास्कर घनघाव, सूधीर पवार, गजानन काटकर, नंदू शेळके, अरूण पठाडे, शरद गिते, कैलास दुधाणी, दिपक जोशी, संतोष दुधनी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक