जालना जिल्हा

जिल्ह्यात प्रभू राम जन्मभूमी पूजन सोहळ्याचा आनंदोत्सव साजरा

जालना ब्युरो न्यूज दि ५

आज आमच्या सारख्याअसंख्य हिंदूंचा आनंद गगनात न मावणारा
– राहुल लोणीकर
दीपक हिवाळे/ परतूर न्यूज नेटवर्क हिंदुस्थानातील आमच्यासारख्या करोडो हिंदू बांधवांच्या आनंदाला उधाण आले असून गेल्या कित्येक वर्षापासून अयोध्येमध्ये राम मंदिराची आस लागलेली होती अखेर गेल्या कित्येक वर्षांच्या या लढ्याला यश आले व हिंदुस्थानचे पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी यांच्या शुभहस्ते आयोध्या मध्ये श्रीराम मंदिराच्या उभारणीची पायाभरणी आज झाली या मुळेआमच्यासारख्या असंख्य हिंदूंचा भावनेचा प्रश्न म्हणजे प्रभू श्रीराम आणि हा प्रश्न खऱ्या अर्थाने आज सुटला असून प्रभू रामचंद्रांचे भव्यदिव्य मंदिर अयोध्येमध्ये साकारण्यास सुरुवात झालेली आहे यामुळे आमच्या परतूर मतदारसंघातील गावागावात दिवाळी साजरी करण्यात येत आहे कोरोणाच्या संकटामध्ये घरीच थांबून मतदारसंघातील प्रत्येकाने कुणी राम स्तोत्र गाउन, कुणी घरावर गुढ्या उभ्या करून, घरासमोर रांगोळ्या काढून, घरात दिवाळी प्रमाणे गोड-धोड करून हा आनंदोत्सव साजरा केला आहे काल आमचे नेते माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रभू रामचंद्र मंदिर भूमिपूजन सोहळा मतदार संघातील गावा गावात दिवाळी प्रमाणे साजरा करण्याचे आवाहन केले होते त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदार संघातील प्रत्येक गावात प्रत्येकाने उत्सव साजरा केला असल्याचेही ते म्हणाले मंदिर भूमिपूजन सोहळ्याचा आपणास मनस्वी आनंद असून प्रभू श्रीरामाचे मंदिर येणाऱ्या काळामध्ये अयोध्येमध्ये साकारले जाणार असल्याने हिंदुस्थानातील करोडो हिंदूंना आनंद झाला असल्याचे भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी म्हटले आहे आज माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांच्या निवासस्थानी राहुल लोणीकर व कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला यावेळी कारसेवक डॉक्टर सुखराज कोटेचा यांचा सत्कार करण्यात आला पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्यांनी राम मंदिर लढ्यात आपले योगदान दिले अश्या असंख्य कारसेवकांचे आपण मना पासून ऋणी असल्याचे ते म्हणाले या वेळी भाजपा चे जेष्ठ नेते भगवानराव मोरे, द या काटे संदीप बाहेकर कृष्णा अरगडे डॉ संजय पुरी राजेंद्र मुंदडा संपत टकले यांच्या सह नागरीक उपस्तीत होते

परतूर

रामनगर येथे विविध धार्मिक कार्यक्रम महंताचे उपस्थितीत संपन्न:
प्रतिनिधी:(सावंगी तलान) रोजी अयोध्या येथील प्रभू रामचंद्र यांच्या मंदिराच्या भूमी पूजन
ऐतिहासिक सोहळा निमित्त ज्या नगरीला(गावाला) अनेक वर्षापासून प्रभू रामचंद्राचे नाव
दिले गेले रामनगर या ठीकानी विविध धार्मिक कार्यक्रम महंताच्या उपस्थितीत संपन्न
झाले.यावेळी सर्वप्रथम गावामध्ये या मुहुर्तावर सकाळी 08:00वाजता ज्ञानेश्वरी
पारायणाला सुरवात करण्यात आली.तदनंतर प्रभू रामचंद्र यांचे प्रतिमेचे विधिवत पूजन
श्री.ह.भ.प.वेदांताचार्य गणेश महाराज कोल्हे यांच्या हस्ते सकाळी १०:०० वाजता करण्यात आले.तसेच गावातील तरुणानी श्रीराम मंदिरामध्ये अभिषेक केले.व नंतर गावातील वारकरी मंडळीनी भजन व विविध सांप्रदायिक गायन केले या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन व नियोजन मा.श्री शरद सोनुने(आबा) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

रामनगर

टेंभुर्णी / सुनील जोशी राम जन्मभुमी अयोध्या मधे भूमी पूजन प्रसंगी टेंभुर्णी येथे घरोघरी गुढी उभारुण घरावर दिवे आणि लायटिंग लावून हा दिवस अविस्मणीय असा साजरा करण्यात आला . येथील जेष्ठ नागरीक गणेशलाल बांगड़ यांनी रोशनाई केली तो क्षण.

पिंपळगाव रेणुकाई येथे श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन

पिंपळगाव रेणुकाईता (ता.भोकरदन)
श्री राम मंदिराच्या भूमिपूजन उत्सवानिमित्त पिंपळगाव रेणुकाई येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच गावातील ग्रामस्थ यांनी श्रीरामाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज शेलुदकर यांच्या हस्ते करण्यात आले नंतर सर्वानी पूजन करून आनंद साजरा केला .

जवळपास गेल्या २१ पिढ्या् तिनशे पन्नास लाख हिंदूचे बलिदान आणी ४९२ वर्षांचा संघर्ष आज पुर्ण झालेला दिसतो श्रीराम मंदिराविषयीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने दिला आणि आयोध्येमध्ये राममंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा झाला. याचा आनंद देशभरातून साजरा केला जात आहे.बुधवरी श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी आयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदीच्या हस्ते भव्य भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आलेले असतानाच देशभरातून देखील श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

१९९२ मध्ये कार सेवक मोतिराम अन्ना नरवाडे, श्रीराम बेराड ,संजय बेराड,,गणेश हिवरे,रवींद देशमुख या कारसेवकांचा सत्कार करण्यात आला
गेल्या ४९२ वर्षापासून प्रलंबित असलेल्या श्रीराम मंदिर देशभरातील भाविकांची श्रीराम मंदिर निर्माणाची प्रतिक्षा संपली. याचा आनंद पिंपळगाव रेणुकाई येथील ग्रामस्थांनी देखील श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून फटाके वाजवून आनंदोत्सव यक्त करत प्रत्येकाच्या घरी राञी किमान ५ दिवे लाऊन दिवाळी साजरी करायची. अश्या प्रकारे आनंद साजरा केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक