जालना जिल्हा

अमरधाम च्या प्रवेशद्वारास स्व. धनराज सांबरे यांचे नांव द्या, शिवसेना नगरसेवकांची मागणी


जालना प्रतिनिधी-गौरव बुट्टे
जालना शहरातील अमरधाम ( शेरी) च्या मुख्य प्रवेशद्वारास समाजसेवक तथा माजी नगरसेवक स्व. धनराज सांबरे यांचे नांव देण्यात यावे अशी मागणी शिवसेना नगरसेवकांनी केली आहे.
या संदर्भात शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक विष्णू पाचफुले यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने गुरूवारी ( ता. ०६) मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांची भेट घेऊन दिलेल्या लेखी निवेदनात म्हंटले आहे की, अमरधाम स्मशानभूमी च्या विकास कामांबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक स्व. धनराज सांबरे यांचे मोठे योगदान असून विविध प्रकारच्या समाजकार्यात अग्रेसर राहिलेल्या स्व. धनराज सांबरे यांनी सर्व प्रथम स्वर्गरथ सुरू केले.

पंढरपूर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांना बस स्थानकात अन्न छञ सेवा ही केली. त्यांचे कार्य पुढील पिढ्यांना स्मरणात रहावे यासाठी नगर परिषदे मार्फत अमरधाम स्मशानभूमी च्या मुख्य प्रवेशद्वारास स्व. धनराज सांबरे यांचे नांव दिलें जावे. या संदर्भात नगरपालिका स्तरावरून लवकर कार्यवाही करावी. अशी मागणी लेखी निवेदनात नगरसेवकांनी केली.


निवेदनावर नगरसेवक विष्णू पाचफुले, रावसाहेब राऊत, गटनेते विजय पवार, सौ. वैशाली ताई जांगडे, निखिल पगारे,रंजनाताई गोगडे, संदीप नाईकवाडे, किशोर पांगारकर,सौ.
उषाताई पवार, सौ.मीनाताई घुगे,वैशाली ताई ठोसरे यांची नांवे व स्वाक्षऱ्या आहेत. या वेळी अशोक पवार, संतोष परळकर, रामनाथ भुतेकर यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक