परतूर तालुका

बिहारी म्हणून आले अन् महाराष्ट्रीयन होऊन गेले,उस्मानपुर येथील रेल्वे स्टेशन मास्तर यांना दिला निरोपदिपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्क
तालुक्यातील उस्मानपुर येथील रेल्वे स्टेशन मास्तर (व्यवस्थापक) श्री. सनी कुमार झा यांची बदली मुंबई येथे झाली. मूळचे बिहारचे असलेले 2016 साली उस्मानपूर येथे रेल्वे स्टेशन मास्तर म्हणून नियुक्ती झाली. ते जेव्हा गावांमध्ये आले

तेव्हापासून त्यांनी स्टेशन परिसरासरा सह गावकरी यांच्यासोबत चांगल्या प्रकारचे स्नेह संबंध ठेवले. गावामध्ये विविध सामाजिक कामांमध्ये सहभागी होणारे सनी कुमार झा यांनी रेल्वे स्टेशन येथे मुलांसाठी खेळाचे मैदान तयार करून दिले. उन्हाळ्यामध्ये स्टेशनमधील गावकऱ्यांसाठी पाणी उपलब्ध करून दिले. ते गावात आल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवा शक्ती मंच उस्मानपुर नावाचा युवकांचा एक ग्रुप तयार केला. त्याद्वारे ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

परिसरामध्ये वृक्षारोपण, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी मार्गदर्शन, 26 जानेवारी ,15 ऑगस्ट ,1 मे. रोजी गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना एकत्र आणून विविध प्रकारचे कार्यक्रम घेत असत. स्वच्छता व साफसफाई याबद्दल ते खूप जागरूक असत. गोरगरीब मुलांना मदत, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करताना स्वतः जवळ असलेली पुस्तके ही देत असत. त्यामुळे त्यांचे आणि गावचे आपुलकीचे एक वेगळेच नाते तयार झाले होते.


त्यांच्या निरोप समारंभाला गावातील ज्येष्ठ नागरिक गावातील तरुण वर्ग शाळेतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. उस्मानपुर येथील गावकर्‍यांच्या मते सनी कुमार झा यांच्यासारखा स्टेशन मास्तर यापूर्वी गावात आला नाही. सनी कुमार झा उस्मानपूर या गावाला स्वतःच्या गावाप्रमाणेच समजत. निरोप समारंभ देताना गावातील गावकऱ्यांचे डोळे पाणावले होते. एक बिहारी म्हणून ते या गावात आले होते. आणि एक महाराष्ट्रीयन होऊन गावातून गेले. आज सकाळी सकाळी 11 वाजल्यापासून तर सायंकाळी सहा वाजेपर्यंत गावातील गावकरी त्यांना भेटण्यासाठी येत होते.

याप्रसंगी गावातील, सरपंच उपसरपंच, राजकुमार राऊत सर, उत्तम वंजारे सर, अशोकराव आंबेकर, ओम काका राऊत , एस आर पी एफ चे ज्ञानेश्वर गलबे, स्वच्छतादूत शिंदे मामा, अतुल राऊत, संतोष राऊत, युवाशक्ती मंचचे अध्यक्ष‌ सुदर्शन राऊत, करीम शेख, इब्राहिम शेख, मुक्तेश्वर राऊत, ओमकार गलबे, राहुल राऊत ,सतीश राऊत, अक्षय राऊत व समस्त गावकरी मंडळी निरोपसमारंभ कार्यक्रमाला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक