परतूर तालुका

परतूर मध्ये थर्मलमीटर व ऑक्सिमीटरची शासकीय अधिकाऱ्याना भेट


दिपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्क
परतूर तालुक्यातील इंग्रजी शाळा संघटनेच्या वतीने परतूर येथील जनतेच्या सर्व्हे साठी थर्मलस्कॅनर व ऑक्सिमीटर च्या 10 संचाची भेट परतूर येथील कोरोना सेंटरला देण्यात आली. परतूर येथील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता परतूर तालुका प्रशासनाने संपूर्ण शहारातील जनतेची तपासणी करण्याचे ठरविले. यासाठी 10 टीम तयार करण्यात आल्या.

त्यांना आवश्यक थर्मलमीटर व ऑक्सिमीटरची गरज असल्याचे डॉ. नवल यांनी संघटनेला कळविले . त्यांच्या आवाहना तात्काळ प्रतिसाद देऊन सदरील संच भेट देण्यात आले . प्रशासना तर्फे SDM जाधव , DYSP बांगर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.नवल , न.प.परतूर चे मुख्याधिकारी सुधीर गवळी , शिक्षण विस्तार अधिकारी सरफराज कायमखनी यांनी हि भेट स्वीकारली. यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष संदिप बाहेकर, तालुका अध्यक्ष एकनाथ कदम , समीर देशपांडे, अभय काळुंके , भाऊसाहेब मुके पाटील यांनी यांनी 10 संचाची भेट दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक