Breaking News
अंबड तालुका

औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याची गरज

वडीगोद्री: (ता अंबड )औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वडीगोद्री टी पॉइंटवरील सर्व्हिस रोडवर जागोजागी मोठमोठे खड़े पडले आहेत. यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. नवीन झालेल्या महामार्गावर खड्डे पडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिन्यापासून खड्डे पडले आहे. मात्र,अद्यापपर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही.

औरंगाबाद – सोलापूर महामार्ग ५२ वर एका वर्षातच खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाचे स्टेटस जास्त असल्याने मजबुतीवर जास्त लक्ष दिले जाते. मात्र, या राष्ट्रीय महामार्गाचे काम काहीअंशी राहिले आहे. यातच महामार्गाची दुरवस्था होत आहे. अंबड तालुक्यातील वडीगोद्री जवळील वडीगोद्री टी पॉइंटवरील औरंगाबाद -सोलापूर महामार्गावरील पुलाजवळ व सर्व्हिस रोडवर खड्डे पडले असून, रस्त्यावरील डांबरही वर आले आहे. त्याचबरोबर सर्व्हिस रोडवरून महामार्गावर येत असताना त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत.

तसेच याच महामार्गावरील मागणी पुलावही खड्डे पडले आहेत. गुत्तेदार व संबंधित कंपनीने चौपदरीकरणाचे काम केले आहे. मात्र, एक वर्षाच्या आत एकाच पावसात खड्डे पडायला सुरुवात झाल्याने कामात हलगर्जीपणा केला असल्याचे समोर आले आहे. पडलेले खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करावे,अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

फोटो प्रतिकात्मक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक