भोकरदन तालुक्यातील पोरक्या झालेल्या मुलीचे शिवसैनीकाने केले कन्यादान
अन् बापा विना पोरक्या झालेल्या मुलीच्या कामी आलं शिवसैनिकाच समाजकारण जालन्यातील शिवसैनिकांचा आर्दश
अन् बापा विना पोरक्या झालेल्या मुलीच्या कामी आलं शिवसैनिकाच समाजकारण
जालन्यातील शिवसैनिकांचा आर्दश
भोकरदन /प्रतिनिधी : २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे जालनाा जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारधच्या शिवसेनेच्या श्रीवास्तव कुटुंबीयांनी जपले
माणुसकीचे नाते. अपघातात मृत्यू झालेल्या अशोक मोरे यांची मुलगी पुजा मोरे हिच्या आजपर्यंतच्या शिक्षणासह लग्नाची ही जबाबदारी पार पाडली.
भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द येथील अशोक मोरे हे १९९० ते २००९ सुमारे १९ वर्ष शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव यांच्याकडे चालक
म्हणून कार्यरत होता. परंतु २००९ मध्ये दुचाकी अपघातामध्ये अशोक मोरे यांचा मृत्यू झाला आणि पत्नीr मुलांसह सर्व कुटूंबावरचे छत्र हरवले. घरचा कर्ता माणूसच गेल्यामुळे त्यांच्यावर संकटाचा डोंगर कोसळला पण त्याच वेळी
त्यांच्या मदतीला शिवसैनिक मनिष श्रीवास्तव धावून गेले. त्यांनी अशोकच्या मुला-मुलींची शिक्षणाची जबाबदारीची स्विकारली. पुजाचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण करून तिचे लग्न बुलडाणा जिल्ह्यातील वर्णा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या जितेंद्र इंगळे याच्या सोबत लावून दिले. या लग्नसमारंभात उपजिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव यांचे बंधू उपसरपंच शेखर श्रीवास्तव व त्यांची पत्नी माजी सरपंच विना श्रीवास्तव यांनी स्वतः कन्यादान केले. लग्नसमारंभात संपुर्ण श्रीवास्तव परिवाराने परिश्रम घेतले. हे वचन फक्त शिवसैनिकच पुर्ण करु शकतो, हे आजचे ताजे उदाहरण आहे.