जालना जिल्हा

वाढदिवसाला केक कापण्यासाठी तलवार घेऊन फिरणाऱ्या ला पकडले


जालना चंदनझिरा पोलिसांची कार्यवाही

न्यूज जालना ब्युरो दि ६ –  चंदनझिरा हद्दीत पेट्रोलिंग सुरू असतांना एक जण तलवार घेऊन येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अनिल काळे यांना मिळाली. माहिती मिळल्याप्रमाणे मटणगल्लीत सापळा लावला असता त्याठिकाणी  एक मुलगा तलवारी घेऊन जाताना पोलिसांना पाहून पळून जात असताना त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

यावेळी  ताब्यात घेतलेल्या मुलाचे नाव आकाश शिवाजी मोटरकर वय 21 वर्ष रा. मातोश्री नगर चंदनझिरा असे आहे.तलवार घेऊन फिरण्याचे कारण विचारता वाढदिवसाच्या केक कापण्यासाठी  घेऊन जात असल्याची माहिती त्याने दिली.पोलीस कर्मचारी अनिल काळे यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे चंदनझिरा येथे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कामगिरी पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले,पोलीस नाईक नंदलाल ठाकूर, अविनाश नरवडे, पोलीस कर्मचारी ,अनिल काळे, अजय फोके, होमगार्ड खुळे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक