जालना जिल्हा

जगभरातील रामभक्तांचे भव्य राम मंदिराचे स्वप्न पुर्ण-रावसाहेब दानवे पाटील

न्यूज जालना  – अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या राम मंदिराचं भूमिपूजन व नऊ पवित्र शिळांचे पुजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाबरोबरच राम मंदिराच्या उभारणीचं काम सुरु झालं आहे. मात्र अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्याचा हा प्रवास काही दशकांचा आहे. अगदी सर्वात आधी भाजपाने हे आश्वासन दिलं होत तिथपासून ते श्रीराम मंदिराचं भूमिपूजन करण्यापर्यंत अनेक घडामोडी घडून गेल्या आहेत.  आज भारतासह जगभरातील रामभक्तांचे भव्य राम मंदिराचे स्वप्न पुर्ण झाले असे उद्‌गार भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी जालना शहरातील स्वा.सै.वीर सावरकर चौकात भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुनिल रुपा पहेलवान खरे यांनी आयोजित कार्यक्रमात सांगितले. अयोध्येत भगवान श्रीराम दैवताच्या भव्य मंदिराचे स्वप्न साकार होत असल्याच्या भावनेतुन अयोध्येत त्रेतायुगासारखा… रघुनंद जणु रघुकुलात परतल्यासारखा उत्साह ना.रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते पेठे, फटाके व पंतगावर जय श्रीराम लिहून जालना शहरात साजरा करण्यात आला. या उत्साहात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे पाटील, भाजपाचे नगरसेवक अशोक पांगारकर, सुनिल राठी, गोवर्धन कोलेकर, राजेश लाला, कमलेश कवरानी, संजय जडवानी, सुमित धन्नानी, कृपाल कच्छवानी, ऍड.विजय करंडे, लखन सुरा, संजय पहेलवान खरे, शंकर सुरा, घनश्याम खाकीवाले, सुनिल भरुेवाल, मनिष नंद, नारायण भगत, नारायण गोमतीवाले, सुरेश कालीवाले, नारायण गोमतीवाले, कमलेश खरे, नारायण भगत, पवन खरे, दिनेश चौधरी, वैभव दिपवाल, बबलु नंद, अर्जुन भगत, सतिष सले, संदीप बटावाले, कन्नु भगत, सुनिल रुपा पहेलवान खरे मित्रमंडळाचे सदस्यांनी साजरो केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक