जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात आठ जणांचा कोरोनाने मृत्यू ;७७ रुग्णांची गुरुवारी भर

न्यूज जालना ब्युरो दि६
जालना जिल्ह्यात गुरुवारी आठ कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर नवीन ७७ रुग्णांची भर पडली आहे.


जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ही २५९६ वर गेली आहे तर ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आता ८१४ वर पोहचली आहे दरम्यान यशस्वी उपचारांनतंर १६९८ जणांना सुट्टी देण्यात आली आहे

जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचा – यांची दिनांक ५ व ६ ऑगस्ट रोजी रॅपीड करोना अँटीजन तपासणी करण्यात आली .यात एकूण १८८ अधिकारी व कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली .त्यापैकी १ पॉझीटिव्ह तर १८७ जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले . जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार गुरुवारी 8 करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाला आहे . एकाच दिवशी आठ जणांचा मृत्यू ची ही ह्या महिन्यातील पहिलीच घटना आहे.

जालना शहरातील नुतन वसाहत -१ राजपूतवाडी -२ स्टेशनरोड ३ , तांदूळवाडी -१ , मंगळबाजार -१ एसआरपीएफ गेट -१ , शंकरनगर -१ , क्रांतीनगर -१ धोपटेश्वर -२ मूर्तीवेस -१ जमुनानगर -१ पेंन्सनपूरा -१ अयोध्यानगर -२ , भवानीनगर -४ , साईनाथ नगर नगर -१ , लक्ष्मीनारायणपूरा -१ एसआरपीएफ -१ , दरेगांव -१ , भोगांव ९ , कुंभारपिंपळगांव -१ , भोकरदन शहर -६ , शहागड ता.अंबड -७ , मेहकर -१ , सेलगांव ता.बदनापूर २ , जिंतूर -१ आष्टी ता.परतूर -१ , भायरवड -१ फत्तेपूर -१ , रवणा परांडा -१ वरुडी गांव १ , सिरसवाडी -१ दरेगांव -१ देऊळगावराजा -१ साडेगांव -१ अंबड शहर -३ , खांडसरी -१ , जाफ्राबाद शहर -१ सिंदखेडराजा -१ गोदेंगांव ता.जाफ्राबाद -१ बीबी जि.बुलढाणा -१ , बदनापूर शहर -१ , एकुण ७३ व्यक्तीच्या स्वबचा व अँटीजेन तपासणीद्वारे ०४ व्यक्तींचा अशा एकुण ७७ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली .

एकूण ७७ रुग्णास डिस्चार्ज

जालना शहरातील रामनगर – ९ , सामान्य रुग्नालय निवासस्थान ३ अग्रसेन नगर -३ , भोला चौक -१ , जेईएस महाविद्यालय परिसर -१ , शिवाजी नगर -२ , यशवंत नगर -५ , दर्गावेस काद्राबाद -१ वु – हाननगर -५ , इंदिरानगर -१ , भाग्यनगर -४ , राज्य राखीव पोलीस बल गट क्र .३ मधील -१ , गोपीकिसन नगर -५ पाणीवेस -२ बिहारीलाल नगर -३ , अशिर्वाद नगर १ सदर बाजार -१ अंबर हॉटेल परिसर -१ , ग्रीनपार्क -१ प्रयागनगर -१ पिवळा बंगला -१ , नेहरु रोड १ , अयोध्या नगर -१ काद्रबाद -२ कन्हैयानगर -१ गुडला गल्ली -१ , सिंधी बाजार -२ संभाजी नगर १ , प्रितीसुधा नगर -१ , सुखशांती नगर -१ पुष्पकनगर २ जालना शहर -२ रोहिलागड ता.अंबड -२ अंबड शहर -४ , सिंदखेडराजा -१ मायानगर औरंगाबाद -१ मजरेवाडी -१ शिवना ता.सिल्लोड -१ , एकूण ७७ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक