मंठा तालुका

मंठ्यात ९५ ब्रास वाळू साठाचा लिलाव : २ लाख २५ हजाराचा महसूल जमा

जप्त वाळू साठ्याचा लिलाव

न्यूज तळणी : मंठा तालुक्यातील सासखेडा व पोखरी केंधळे येथिल ९५ ब्रास जप्त वाळू साठ्याचा लिलावापोटी २ लाख २५ हजाराचा महसूल जमा झाला आहे .पूर्णा नदीपात्रातुन भर पावसाळ्यातही अवैध वाळू उत्खनन करुन साठा व वाहतूक सुरू आहे. महसूल विभागाने अवैध वाळू साठा जप्तीची कारवाई केली होती. सासखेडा येथे ३५ ब्रास तर पोखरी केंधळे येथे ६० ब्रास वाळू साठा जप्त केला होता . ‘त्या’ जप्त वाळु साठ्याचा लिलावापोटी २ लाख २५ हजाराचा महसूल जमा झाला आहे . सदर लिलाव परतूरचे उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात पार पडला.

महसूल विभागाने जप्त केलेल्या वाळू साठ्यात संबंधित गूत्तेदाराकडुन अवैध वाळू उत्खनन करून अतिरिक्त वाळू साठा केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे भरपावसाळ्यात उत्खनन -उस्वद, कानडी , लिबखेडा, सासखेडा, दूधा, टाकळखोपा, वाघाळा व पोखरी केंधळे येथून भर पावपावसाळ्यात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप अन्याय भष्ट्राचार निमूलन समितीचे जिल्हाध्यक्ष उमेश कृटे यांनी केला आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक