जालना जिल्हा

जिल्ह्यात आणखी ४० रुग्णांची भर जिल्ह्याची संख्या २६२३ वर

न्यूज जालना ब्युरो दि ६ जालना जिल्ह्यातील २७ संशयीत रुग्णांचे अहवाल गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे एकूण ४० कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रूग्णांची संख्या आता २६२३ इतकी झाली आहे. त्यात आजपर्यंत ८४ कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला असून १६९८ रुग्णांना सुट्टी देण्यात आल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले आहे. गुरुवारी सकाळी १३ संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले होते. तर रात्री त्यात आणखी २७ रूग्णांची भर पडली असून एकूण ४० रूग्णांची वाढ झाली आहे. रात्री पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्या रुग्णांमध्ये जालना शहरातील जुना जालना भागातील भाग्यनगर मधील तीन रुग्णांचा समावेश असून म्हाडा कॉलनी,सिंधी बाजार,गायत्री नगर, माऊली नगर,नूतन वसाहत, देऊळगाव राजा जालना,पांगारकर नगर,शकुंतला नगर,आझाद मैदान, गांधी चमन,इन्कम टेक्स कॉलनी,रेणुका अपार्टमेंट टाऊन हॉल,रेल्वे स्टेशन रोड या परिसरातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तसेच भोकरदन येथील जयभवानी नगर मधील 3, आष्टी ता.परतूर येथील 3, मासनपूर ता.भोकरदन, खासगाव ता.जाफराबाद, बानेगाव ,अंबड येथील जवाहर कॉलनी आणि बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.१४१ जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती या सुत्रांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक