घनसावंगी तालुका

जांबसमर्थ परिसरात संततधार पावसामुळे उसाचे नुकसान, पंचनामे करण्याची मागणी


जांब समर्थ / कुलदीप पवार दि.७
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ व परीसरात बुधवारी दि. ५ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास दमदार पावसाने हजेरी लावली.जवळपास एक तास पाऊस व वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसात हजारो हेक्टर ऊसाची नुकसान झालेली आहे.

परीसरात अनेक शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करुन कसेबसे पिकांचे जीवदान करत होते.पण अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने प्रचंड प्रमाणात ऊसाचे नुकसान झालेले आहे.झालेल्या नुकसानाची त्वरीत महसुल प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी सर्जेराव पवार, सखाराम पवार,वसंत राठोड,नाथा पवार,जगण राठोड, बापुराव पवार, सुरेश पवार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक