भोकरदन तालुका

अखिल वारकरी संघाच्या प्रदेश प्रवक्ते पदी ह.भ.प. संतोष महाराज आढावणे पाटील यांची निवड

मधुकर सहाने : भोकरदन

अखिल वारकरी संघाच्या प्रदेश प्रवक्ते पदी ह.भ.प.श्री संतोष महाराज आढावणे पाटील यांची निवड
आज दि.५ आॅगस्ट रोजी मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदीराच्या भूमिपूजन प्रसंगाचे औचित्य साधून या सुवर्णपर्वकाळाच्या शुभमुहूर्तावर आळंदी येथे अखिल वारकरी संघ राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते प्रदेश प्रवक्ते पदावर ह.भ.प.श्री संतोष महाराज आढावणे पाटील यांची निवड करून नियुक्ती पञ देण्यात आले.

ह भ संतोष महाराज आढावणे पाटील यांनी वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य आपल्या कीर्तन कथातून अविरत पण चालू ठेवलेले आहे आजपर्यंत महाराजांनी आपल्या कीर्तन,प्रवचन,व्याख्यान,राष्ट्रीय कथांतून महाराष्ट्राबरोबर अन्य राज्यांतही वारकरी विचार पोहचवून समाजमन जागृत करत मार्गदर्शन करून समाजाला प्रबोधनपर नवसंजीवनी देण्याचे कार्य अविरतपणे करत असून त्यांनी स्त्री भ्रूण हत्या,हुंडाबळी,झाडे लावा झाडे जगवा,व्यसनमुक्ती, देशसेवा,या समाजप्रबोधनपर विषयांवर मार्गदर्शन करत आध्यात्मिक ज्ञानाचा उपदेश तळागाळापर्यत पोहचवण्याचे कार्य हाती घेतलेले आहे याचं कार्याची दखल घेऊन नुकतीच त्यांची अखिल वारकरी संघाच्या प्रदेश प्रवक्ते पदी निवड करण्यात आली असून सदरील निवडीचे सर्वत्र कौतुक होत असून महाराजांचे महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.


यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प.मच्छिंद्र महाराज धानेपकर.राष्ट्रीय उपाध्यक्ष गोविंद महाराज गोरे,राष्ट्रीय सचिव संजय महाराज हिवराळे,राष्ट्रीय खजिनदार प्रविण महाराज लोळे पाटील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जाधव,राष्ट्रीय कोषाध्यक्ष यशवंत महाराज फाले,राष्ट्रीय संघटक पांडुरंग महाराज शितोळे शास्ञी,राष्ट्रीय सल्लागार आत्मारामजी शास्ञी महाराज,राष्ट्रीय प्रचार प्रमुख लक्ष्मण महाराज पाटील, राष्ट्रीय सदस्य सतीश आण्णा,राष्ट्रिय प्रवक्ते तुकाराम महाराज मुंडे शास्ञी,राष्ट्रीय सदस्य सतीश आण्णा वाल्हेकर, मराठवाडा विभाग अध्यक्ष निरंजन भाईजी महाराज,मराठवाडा विभाग उपाध्यक्ष आक्रुर महाराज साखरे,कार्याध्यक्ष सतीश महाराज जाधव शास्ञी,मराठवाडा प्रवक्ते सोपान महाराज सानप शास्ञी,मराठवाडा कोषाध्यक्ष पांडुरंग महाराज रेड्डी, मराठवाडा संघटक दादा पाटील,गणेशानंद कोळसकर शास्ञी,विठ्ठल महाराज शिंदे यांची प्रमुख उपस्थित होती यावेळी सर्वांनी महाराजांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी सदिच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक