परतूर तालुका

आष्टीत नवीन आठ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ एकूण रुग्णसंख्या तेरा


राजेश्वर नायक/ आष्टी :- दि ७

आष्टी (ता परतूर)येथील आठ जणांचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील काल तीन कर्मचाऱ्यांसह आणखी एकाचा कोरोना अहवाह पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य विभागासह गावात खळबळ उडाली होती तर १५ जणांना क्वारनटाईन करण्यात आले होते आष्टी येथील एकास काही दिवसांपूर्वी सर्दी खोकला ताप येत असल्याने जालना येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले होते त्या ठिकाणी त्याची कोरोना चाचणी केली असता बुधवारी रात्री त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता तर परतूर ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्याचा अहवाल सोमवारी कोरोना पॉझिटीव्ह आला होता

त्यांच्या संपर्कातील आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील १० कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट केली असता बुधवारी सायंकाळी ७ जनांचे अहवाल निगेटिव्ह तर तीन जनांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने आष्टीत एकाच दिवशी चार जनांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने यांच्या संपर्कातील १५ जणांना क्वारनटाईन केले होते यांच्या परिवारातील लोकांना आंबा येथे पाठविण्यात आले होते दरम्यान आज दिवसभरात आणखीन आठ कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचा अहवाल आला एकूण रुग्ण तेरा संख्या झाली असुन आष्टीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक