जालना जिल्हा

मराठा आरक्षणाकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष;संघटनांचा आरोप; तीव्र आंदोलनाचा इशारा

बदनापूर तहसीलदार यांना निवेदन सादर..

किशोर सिरसाठ/बदनापूर दि ७:

राज्यात महाआघाडी सरकार स्थापन होऊन ८-९ महिने झाले तरी मराठा समाजाच्या महत्त्वाच्या विषयांबाबत मंत्रिमंडळातील कोणीही लक्ष घातलेले नाही. समाजाच्या प्रश्नांवर साधी बैठक देखील घेण्यास ठाकरे सरकारलाच वेळ नाही. सरकारने प्रश्न सोडविण्यासाठी त्वरित लक्ष न घातल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा संघटनांनी व मराठा समन्वय समितीने दिला आहे.

मराठा आरक्षण व समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात गुरूवारीता.06 रोजी मराठा संघटनांनी तहसीलदार यांना निवेदन देले आहे. मराठा आरक्षणाबाबत समाजात मोठी चिंता आणि काळजी वाढत आहे. मागील सरकारने उच्च न्यायालयाच्या टिकवलेले आरक्षण आपल्या सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवावे म्हणून आम्ही हे निवेदन बदनापूर तहसीलदार यांना दिले आहे.निवदनांचा पहिला टप्पा म्हणून या निवेदनाद्वारे शासनाचे लक्ष वेधून घेत आहोत. प्रश्न मार्गी नाही लागले तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील पदाधिकाऱ्यांनी दिला.

यावेळी मराठा समन्वयक श्री.पंकज जऱ्हाड, श्री.नामदेव बोराडे,श्री.दादा जगताप,श्री.रुद्रा पाटील,श्री.किशोर मदन,श्री.रवी मदन,इत्यादीच्या उपस्थिती तहसीलदार छाया पवार यांना निवेदन सादर केले.

“मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतात हे महाआघाडी सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे असे निर्दशनात आले सरकार स्थापन होऊन 8- 9 महिण्याचा कालावधी उलटून सुद्धा हे सरकार मराठा समाजाच्या प्रश्नावर साधी बैठक देखील घेण्यास ठाकरे यांनी विचार केला नाही असा मराठा समाजाचा व संघटनेचा आरोप आहे.


या ठाकरे सरकारने प्रश्न सोडवण्यासाठी जातीने लक्ष घालावे ही आमची मराठा समाज व संघटनेच्या, व मराठा समन्वय समितीच्या वतीने रीतसर मागणी आहे. आम्ही थेट तहसीलकार्य लय मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे आमच्या आरक्षणाच्या बाबतीत मागण्या आहे. सरकारने तत्काळ गांभीर्य लक्षात घेऊन अंमलबजावणी करण्यात यावी अन्यथा आम्हाला नाईलाजाने तीव्र आंदोलन करावा लागेल(फोटो प्रतिकात्मक)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक