Breaking News
जालना जिल्हा

जालनाचे शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांचे प्रहार संघटनेकडून स्वागत.

गौरव बुट्टे /जालना दि .७ जालना जिल्हा परिषद येथे बदली कारणाने उपस्थित झालेले शिक्षणाधिकारी ( प्राथ . ) कैलास दातखीळ यांचा प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .

याप्रसंगी शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांनी जिल्हयातील शिक्षकांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढू असे संघटनेला आश्वासित केले . यानंतर संघटनेकडून शिक्षण विभागामध्ये नव्याने उपस्थित झालेले वरिष्ठ सहाय्यक पराड व जोगदंड यांचे स्वागत करण्यात आले . आजारी असूनही निवडश्रेणी प्रक्रिया निकाली काढण्यासाठी प्रामाणिक काम करणारे पंजाबराव खिल्लारे यांचाही संघटनेकडून यथोचित गौरव करण्यात आला.प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना जिल्हा संघटक पदी आकाश नरवाडे यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांचाही सर्व पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला .

आजच्या या शिष्टमंडळा मध्ये प्रहार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष श्री संतोष राजगुरू यांच्यासह मुकेश खरात , बालाजी माने , लहू राठोड , संदीप पितळे , फेरोज बेग , दिपक उगले , राहुल इंगळे , मंगेश भुतेकर यासह इतर शिक्षकांची उपस्थिती होती .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक