Breaking News
परतूर तालुका

परतुरात आज पुन्हा 15 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची भर

दिपक हिवाळे / परतूर न्यूज नेटवर्क
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या तालुक्यातील आज पुन्हा एकाच वेळी 15 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नागरीकात खळबळ माजली आहे. तालुक्यात एकुण कोरोणा पाँझिटीव्ह रुग्ण संख्या 84 झाली असुन सध्या 43 रुग्ण अँक्टीव्ह आहेत .

आज आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील अंबा येथे 35 जनांना विलगीकरण कक्षात तर ,25 जनांना होम काँरंटाईन करण्यात आलेले आहे. दरम्यान आज आलेल्या कोरोणा पाँझिटिव्ह अहवालात शहरातील सोमाणी गल्ली 1 , सरस्वती काँलनी 4, मोंढा पोलीस चौकी 1, मोंढा 1, व आष्टी येथील 8 असे एकुण 15
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल प्राप्त झाल्याची माहिती परतुर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.डी. आर. नवल यांनी न्यूज जालना प्रतिनिधीशी बोलतानी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक