अंबड तालुका

अंबड तालुक्यात या गावात एकाच दिवशी 39 कोरोना रुग्ण

अनिल भालेकर/अंबड

अंबड तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोना आपली चिंताजनक मगरमिठीत घेत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत असली तरी मात्र सर्वसामान्य जनतेची कोरोना उपाय बंदीसाठी असलेली उदासीनता, याबाबत केलेला निष्काळजीपणा आता प्रशासनाच्या प्रशंसनीय कार्याबद्दल एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अंबड तालुक्यातील तर महाकाळा या गावातील एकाच दिवशी 39 पूर्ण रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचा जवळच्या असणाऱ्या मुख्य बाजारपेठेशी अनेक कारणाने दैनंदिन व्यवहार असतोच.परंतु आता ग्रामीण भागातही कोरोना पादुर्भाव मोठ्या प्रमाणात फैलावत असल्यामुळे प्रशासनाची एक प्रकारे आता कसोटी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक