जाफराबाद तालुका

धक्कादायक-वरुडमध्ये हौदात पडून दिड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

वरुड बु प्रतिनिधी विठ्ठल वाघमारे

जाफराबाद तालुक्यातील वरुड बु येथे अवघ्या दिड वर्षाची चिमुकलीचा हौदात पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे

अनंथा शिंदे हे शेतात पोलन करत असताना यांची दिड वर्षांनी मुलगी हौदाच्या आवारात खेळत होती.घरासमोर पाण्याचा हौद असून, त्यात पाणी साठवून ठेवले होते. खेळताखेळता हौदाकडे गेली. हौदाच्या कठड्यावर चढून तिने आत डोकावले. त्यानंतर तिचा तोल जाऊन ती आत पडली.

दरम्यान, अर्ध्या तासानंतर नातेवाईकांना ही बाब ध्यानात आली मात्र योपर्यत वेळ निघून गेलेली होती .ह्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक