जाफराबाद तालुका

जालना जिल्हा परिषदेच्या घंटागाड्यांची देखभालअभावी दुरावस्था.

अकोलादेव / बि. डी. सवडे

जालना जिल्हा परिषदेच्या घंटागाड्यांची दुरुस्ती व देखभाली अभावी मोठी दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. जालना जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद वार्षिक नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हातील आदर्श ग्रामसंसद कार्यालयांना गावा गावातील निर्माण होणारा घन कचरा व त्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी घन कचरा वाहतूक करण्यासाठी जिल्हा परिषदेने गंटागाड्या दिल्या होत्या.

या गाड्याचे मेन्टेनन्स व देखभाली अभावी या सदरील गाड्या भंगारतच जमा झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे गावात कचरा घेण्यासाठी घरोघर फिरणार्‍या गंटागाड्या आता बंद झाल्याने गावात पुन्हा घाणीचे साम्राज्य पसरून नागरीकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. या गंटागाड्याची जिल्हा परिषदेने तात्काळ या दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी अकोलादेव येथील ग्रामस्थांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक