मंठा तालुका

दैनिक पुण्यनगरीचे संपादक मुरलीधर बाबा शिंगोटे यांना मंठा पत्रकारांची श्रद्धांजली

मंठा/ प्रतिनिधी :

दैनिक पुण्यनगरी वृत्तसमूहाचे संस्थापक-संपादक मुरलीधर बाबा शिंगोटे यांना मंठा तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित कार्यक्रमात पत्रकार संघाचे जिल्हा सचिव दिनेश जोशी यांनी दैनिक पुण्यनगरी वृत्त समूहा’चे संपादक मुरलीधर बाबा शिंगोटे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला त्यांचे कार्य प्रेरणादायी होते असे उदगार जोशी यांनी काढले. यावेळी बोलताना पांडुरंग खराबे म्हणाले की, मुरलीधर बाबा शिंगोटे यांनी पत्रकारिता क्षेत्रांमध्ये परिस्थितीवर मात करून भरीव योगदान दिले.

यावेळी पत्रकार संतोष दायमा, नागेश कुलकर्णी, पांडुरंग खराबे , पंडितराव बोराडे, बाबासाहेब कुलकर्णी, कृष्णा भावसार, प्रदीप देशमुख, बालाजी कुलकर्णी ,अनिल बा.खंदारे ,तुकाराम मुळे, बाबूजी तिवारी, रणजीत बोराडे, अतुल खरात ,विजय देशमुख ,हाफिज बागवान ,मोसिन कुरेशी, रमेश देशपांडे ,डॉ आशिष तिवारी, आसाराम शेळके, प्रवीण दीक्षित यांची उपस्थिती होती यावेळी सर्व पत्रकार बांधवांनी मुरलीधर बाबा शिंगोटे यांना श्रद्धांजली अर्पण केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक