घनसावंगी तालुका

पिपंरखेडच्या नारोळा नदीतून अवैध वाळू उपसा:महसूल विभाग अनभिज्ञ

धर्मराज आंधळे/पिंपरखेड

सध्या सर्वदूर कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र, लॉकडाऊनचा गैरफायदा घेत पिपंरखेड बु. येथील नराेळा नदीपात्रातून रात्रीच्या वेळेस बेसुमार वाळू उपसा होत आहे. याकडे महसुल विभाग मात्र अनभिज्ञ असल्याने कुठलीही कारवाई होत नाही

सध्या तहसील प्रशासन कोरोनाच्या कर्तव्यात व्यस्त असल्याचा फायदा घेत चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक करणा-यांचे चांगलेच फावले आहे.पिपंरखेड व परिसरातुन रात्रीच्या वेळेस अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याचे नागरीकांमधून सांगितले जात आहे. तसेच कोरोनामुळे खुपच अडचणी असल्याने घरांचे बांधकाम करणा-या सामान्य नागरीकांना अवाजवी भावाने अवैध पुरवठा केला जातो. या वाळू तस्करांचे एजंट असून यांच्या मध्यस्तीने ऑर्डर घेऊन रात्रीच्या वेळी खुपच सावधानी बाळगत महसूल प्रशासनाची चाहूल घेत वाळू पुरवठा केला जात आहे.

प्रशासन एकीकडे कोरोनाशी दोन हात करण्यात गुंतले असतांना या संधीचा वाळू माफिया चांगलाच फायदा उचलतांना दिसत आहेत. माेठ्या प्रमाणात वाळू वाहतूक केली जात असून याकडे संबंधितांचे हेतूपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचे देखील बोलले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक